आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंपोरमधील चकमक: श्रीनगरच्या ईडीआय इमारतीत दुसऱ्यांदा घुसले दहशतवादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - श्रीनगरपासून सुमारे ११ किलोमीटर दूर पंपोर भागातील सेमपोरात सोमवारी सकाळी तीन दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या (जेकेईडीआय) मुख्यालय परिसरात हल्ला केला. इमारतीत घुसलेले दहशतवादी दिवसभर अधूनमधून आणि पोझिशन बदलून गोळीबार करत होते. त्यात पोलिस आणि लष्कराचे दोन जवान जखमी झाले.
त्यानंतर १२ तासांनी संध्याकाळी सहा वाजता लष्कराने आयईडीचा स्फोट घडवून इमारतीचा एक भाग उडवून दिला. त्यानंतरही दहशतवाद्यांचा गोळीबार सुरूच आहे. दहशतवादी ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. या इमारतीत दहशतवादी घुसण्याची ही या वर्षातील दुसरी वेळ आहे.

सकाळी सुमारे सहा वाजता दहशतवादी इमारतीत घुसले होते. सकाळची वेळ असल्याने मोजकेच लोक तिथे होते. या इमारतीत अनेक विभाग आहेत. येथे प्रशिक्षणही दिले जाते. सकाळी लष्कर, पोलिस आणि सीआरपीएफची पथके घटनास्थळी सज्ज होती.इमारत खूप मोठी अाहे, दहशतवादी ठिकाणी बदलून गोळीबार करत आहेत.
त्यामुळे जवानांना मुकाबला करण्यात अडचण येत आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी इमारतीतून लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. कार्यालय हायवेवर असल्याने हायवेही बंद करण्यात आला आहे. लष्कराचे पॅरा कमांडो जवानही कारवाईत सहभागी आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अंधार झाल्याने गोळीबार बंद करण्यात आला आहे. पण दहशतवादी पळून जाऊ नयेत म्हणून घेराबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

झेलमच्या मार्गाने आले
सुरक्षा संस्थांनुसार, ईडीआय इमारतीत हल्ला करणारे दहशतवादी झेलम नदीतून नावेद्वारे पोहोचले असावेत. ही इमारत झेलमकिनारी आहे. नावेतून उतरून ते इमारतीत घुसले. ते कुठून आले हे समजले नाही. यापूर्वीही दहशतवाद्यांनी उरीत दोन हल्ल्यांसाठी नावेची मदत घेतली होती. बारामुल्ला येथे झालेल्या हल्ल्यातही नाव आणली होती.
इमारतीवर यावर्षी दुसऱ्यांदा हल्ला
यावर्षी दुसऱ्यांदा ईडीआय इमारतीवर हल्ला झाला आहे. यापूर्वी फेब्रुवारीत हल्ला झाला होता. तेव्हा चकमक ४८ तास चालली होती. तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. तसेच सुरक्षा दलांचे पाच जवानही हुतात्मा झाले होते. एका नागरिकाचाही मृत्यू झाला होता.
बातम्या आणखी आहेत...