आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीनगरमध्ये CRPF कॅम्पजवळ सीमा सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला, 4 जवान जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या झकुरा भागात सीआरपीएफ कॅम्पजवळ सीमा सुरक्षा दल (एसएसबी)च्या पेट्रोलिंग तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला असून यामध्ये 4 जवान जखमी झाले आहेत. जवान ड्युटी करून परत येत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 28 सप्टेंबरनंंतर काश्मीरमध्ये सहा दहशतवादी हल्ले झाले आहेत.
मागील 5 हल्ले...
1. शोपियां, 11 ऑक्टोबर: अतिरेक्यांनी मंगळवारी, 11 ऑक्टोबरला सकाळी आरपीएफच्या तुकडीवर ग्रेनेड हल्ले केले. या दोन जवानांसह सहा लोक जखमी झाले.

2. पंपोर, 10 ऑक्‍टोबर: अतिरेक्यांनी सर्वात आधी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार केला. नंतर ते जेकेईडीआयच्या इमारतीत घुसले. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत. तब्बल 56 तास चाललेल्या एन्काउंटरमध्ये कमांडोजनी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले.

3. शोपियां, 8 ऑक्टोबर: अतिरेक्यांना पोलिस चेकपोस्टवर हल्ला केला. यात एक पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाला. या हल्ल्यात किती अतिरेकी होते, याबाबत माहिती मिळाली नाही.

4. कुपवाडा, 6 ऑक्टोबर: कुपवाडामधील हंदवाडा येथील लंगेट येथील आर्मी कॅम्पवर अतिरेक्यांनी अंदाधूंद गोळीबार केला होता. जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तीन अतिरेक्यांचा खात्मा झाला होता. अतिरेक्यांकडे पाकिस्ताना बनलेली औषधी आणि दुसरे साहित्य सापडले होते. आर्मीचे हे ऑपलेशन तब्बल सहा तास चालले होते.

5. बारामूल्ला, 2 ऑक्टोबर: सर्जिकल स्ट्राइकनंतर अत‍िरेक्यांनी बारामूल्ला येथील बीएसएफ आणि आर्मीच्या कॅम्पला टार्गेट केले होते. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता. हल्ल्यानंतर अतिरेकी पसार झाले होते.
बातम्या आणखी आहेत...