आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मूू काश्मीर: पेट्रोलिंग करुन परत येणार्‍या CRPFच्या जवानांवर हल्ला; 1 जवान शहीद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील जकूरा येथे केंंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पजवळ पेट्रोलिंग पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात एक जवान शहीद झाला असून आठ जवान जखमी झाले आहेत. जवान ड्यूटी करून घरी येत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. 28-29 सप्टेंबरनंतर काश्मीरमध्ये 6 दहशतवादी हल्ले झाले आहेत.

काय म्हणाले एसएसबीचे आयजी...
- एसएसबीचे आयजी दीपक कुमार यांनी सांगितले की, जवान पेट्रोलिंग करून घरी परत येत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.
- गोळीबारात एक जवान शहीद झाला असून 8 जखमी झालेे. त्यापैकी 3-4 जवानींची प्रकृती गंभीर आहे.
- दहशतवाद्यांनी नागरी वसाहतीत जवानांवर टारगेट केले. परिणामी जवानांना प्रत्युत्तर देता आले नसल्याचे दीपक कुमार म्हणाले. जवानांवर हल्ला करून पसार झालेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्‍यात येत आहे. सर्चिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सर्जिकल स्ट्राइकनंतर काश्मीर खोर्‍यात झाले पाच अतिरेकी हल्ले...
बातम्या आणखी आहेत...