आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ यात्रेवर अतिरेकी हल्ला, 6 महिलांसह 7 ठार, महाराष्ट्रातील दोघींचा समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर/ नवी दिल्ली - काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर साेमवारी रात्री अतिरेक्यांनी अंदाधुंद गाेळीबार केला. या हल्ल्यात सहा महिलांसह सात यात्रेकरूंचा मृत्यू झाला. ३२ यात्रेकरू जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील पालघर येथील दोन महिलांचा समावेश आहे. वलसाड येथील ट्रॅव्हल कंपनीसोबत महाराष्ट्रातील भाविक अमरनाथ यात्रेला गेले होते.
 
महाराष्ट्रातील दोन महिलांचा मृतांमध्ये समावेश 
- अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील काही भाविकांचा समावेश आहे. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात पालघर येथील दोन भाविक महिला ठार झाल्या असून डहाणू येथील काही भाविक जखमी आहेत. प्रकाश वजानी, भाग्यमनी ठाकूर, रमेश बडोला, तिता मंजीलाल भाई, इजलिता डोगरा जखमी आहेत. 
- महाराष्ट्रातील पालघर येथील निर्मलाबेन ठाकोर आणि उषा सोनकर यांचा मृतांमध्ये समावेश आहे. 
 
हल्ल्यातील पाच मृत गुजरातच्या वलसाडचे आहेत, तर दोन महाराष्ट्रातील महिला आहे.  यात्रेकरुंची बस यात्रा पूर्ण करून परतत होती. बहुतेकदा सर्व वाहने ही सुरक्षा पथकाच्या ताफ्यासोबत जातात. मात्र, सोमवारी ताफा चार वाजताच परतला होता. दुसरीकडे, हल्ला झालेली ओम ट्रॅव्हल्सची बस ताफ्यापासून वेगळी झाली होती. बसमधील प्रवासी योगेश यांनी सांगितले की, ‘बस पंक्चर झाली हाेती. ते काढेपर्यंत दोन तासांचा वेळ गेला. यामुळे बस सुरक्षा ताफ्यापासून मागे राहिली. रात्री ८.२० वाजता बसवर अतिरेक्यांनी हल्ला केला. गोळीबार होत असताना बसचालकाने वेगाने बस पळवली. यामुळे अनेकांचा जीव वाचले. बसमध्ये एकूण ६० यात्रेकरू होते.’ घटनेनंतर दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आपत्कालीन बैठक घेतली. यानंतर यात्रा सुरूच ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. सोमवारी यात्रेचा १३ वा दिवस व हिंदी पंचांगाचाही पहिला श्रावणी सोमवार होता.
 
केंद्र सरकारची घोषणा : यात्रा सुरूच राहणार
- जम्मू-काश्मीर पोलिस आयजी मुनीर खान यांनी लष्कर व सीआरपीएफला पत्र लिहून अतिरेकी १०० ते १५० यात्रेकरूंना मारण्याचा कट रचत असल्याचे कळवले होते. 
- काश्मिरात इंटरनेट सेवा बंदी करण्यात आली आहे. अतिरेक्यांसाठी शोधमाेहीम सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती रात्री अनंतनागमध्ये आल्या. 
 
- १३ दिवसांत १.३४ लाख भाविकांनी यात्रा पूर्ण केली आहे. 
- ८ जुलैला वानीच्या मृत्युदिनी खबरदारी म्हणून यात्रा स्थगित केली होती.
 
४० हजार जवान तैनात, उपग्रहाद्वारे यात्रेची ट्रॅकिंग, ड्राेनने निगराणी, तरीही झाला अतिरेकी हल्ला
अमरनाथ यात्रेसाठी प्रशासनाने आतापर्यंत सर्वात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. ४० दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या सुरक्षेसाठी ४० हजारांहून जास्त जवान तैनात करण्यात अाले आहेत. यामध्ये लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ व बीएसएफच्या जवानांचा समावेश आहे. पहिल्यांदाच संपूर्ण अमरनाथ यात्रेचे ट्रॅकिंग उपग्रहाद्वारे होत आहे. याशिवाय यात्रेकरूंच्या देखरेखीसाठी ड्रोनचीही सेवा आहे. यासोबत संपूर्ण मार्गावर मोबाइल बंकर गाड्या आहेत. त्याचबरोबर जम्मूपासून बालटाल व पहलगामपर्यंत सुरक्षा दलांच्या रस्ता मोकळा करणाऱ्या तुकड्या तैनात आहेत. यात्रेकरूंच्या गाड्या महामार्गावर सुरक्षित येण्या-जाण्यासाठी या तुकड्या मदत करतात.
 
पुढील स्लाइडवर वाचा, १७ वर्षांपूर्वी २७ ठार झाले होते आणि हल्ल्याचे दोन वेगवेगळे दावे...
बातम्या आणखी आहेत...