आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाममध्ये अतिरेकी हल्ल्यात १४ जण ठार, बाजारपेठेत अतिरेक्यांचा अंदाधुंद गाेळीबार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोकराझार येथील बाजारात झालेल्या ग्रेनेड ब्लास्टमध्ये 14 जण ठार. सोशल मीडियावरुन घेतलेला फोटो. - Divya Marathi
कोकराझार येथील बाजारात झालेल्या ग्रेनेड ब्लास्टमध्ये 14 जण ठार. सोशल मीडियावरुन घेतलेला फोटो.
कोक्राझार - आसामच्या कोक्राझार शहरातील प्रचंड वर्दळीच्या बाजारपेठेत अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार करून १४ लोकांचे बळी घेतले. इसिस या अतिरेकी संघटनेच्या धर्तीवर केलेल्या या हल्ल्यात २० जण जखमी झाले. सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक हल्लेखोर मारला गेला. लष्कर व सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी केली असून अतिरेक्यांची शोधमोहीम सुरू आहे. या हल्ल्यात नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या (सोंगोबिजीत) अतिरेक्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता पाच ते सात अतिरेकी एका व्हॅनमधून बालाजी तिनिआली बाजारपेठेत घुसले. त्यांनी तेथे अंदाधुंद गोळीबार सुरू केला. अतिरेक्यांनी ग्रेनेडद्वारेही हल्ले केले. या हल्ल्यात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांनी रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. हल्लेखोर याच परिसरातील जवळपासच्या घरांमध्ये लपून बसले असावेत, अशी शंका आहे. शुक्रवारी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल दिल्लीमध्येच होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना ५ लाख आणि जखमींना १ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आम्ही व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे, असे आसामचे पोलिस महासंचालक मुकेश सहाय यांनी सांगितले. आसाममध्ये भाजप सरकार सत्तारूढ झाल्यानंतर अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळावरील फोटो..
बातम्या आणखी आहेत...