आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Attack At Pathankot In Punjab 2 Jan 2016

गुरदासपूर सारखाच पठाणकोट हल्ल्याचा पॅटर्न, हल्ल्याने उपस्थित झाले प्रश्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट एअरबेसवरील हल्ल्यानंतर तैनात पोलिस - Divya Marathi
पठाणकोट एअरबेसवरील हल्ल्यानंतर तैनात पोलिस
पठाणकोट - या हल्ल्याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पाकिस्तान बॉर्डर केवळ 20 किलोमीटरवर असलेल्या पठाणकोटला याआधीही लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्याने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
1 - किती महत्त्वाचे आहे पठाणकोट आणि एअरबेस

- पठाणकोट पंजाब, जम्मु-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेलगतचे शहर आहे.
- पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेले हे शहर आहे. येथे एअरबेसशिवाय लष्कराची छावणी देखील आहे.
- पठाणकोट एअरबेस वेस्टर्न कमांड अंतर्गत येते. हे बॉर्डरच्या अतिशय जवळ आहे.
- 1965 आणि 1971 च्या युद्धात या एअरबेसचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
- या एअरबेसमध्ये मिग-21 विमाने देखील असतात.
- देशातील हवाई सुरक्षेची मोठी जबाबदारी या एअरबेसवर असते.
- एअरफोर्सच्या 18 विंग येथे आहेत. एअरफोर्स अधिकाऱ्यांचे कुटुंबिय देखील येथे असतात.

2 - कुठून आले दहशतवादी
- पठाणकोटला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पॅटर्न प्रथमदर्शनी जुलैमध्ये गुरदासपूर येथील पोलिस स्टेशनवर झालेल्या हल्ल्यासारखा आहे.
- आर्मी गुप्तचर, आयबी आणि रॉला पूर्ण विश्वास आहे, की दहशतवादी पाकिस्तान मार्गे आले होते.
- गुरदासपूर आणि पठाणकोटच्या जवळ रावी नदी आहे. त्याच्या आसपासच्या परिसरात काही मोसमी नाले आहेत.
- सूत्रांचे म्हणणे आहे, की या भागावर पूर्णपणे नजर ठेवली जाते, मात्र उंच वाढलेल्या गवतामुळे दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी होतात.
- दहशतवादी रावी नदीच्या मार्गे शकरगड आणि अकालगडपर्यंत पोहोचतात.
- त्यानंतर परिसरातील गावातून महामार्गापर्यंत पोहोचतात. हा हायवे पंजाब आणि जम्मु-काश्मीरला जोडतो.
3 - एअरफोर्स बेसमध्ये कसे घुसले दहशतवादी
- दहशतवादी मुख्य प्रवेशद्वारातून आत आले. ते आर्मी गणवेशात असल्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला, असे सांगितले जात आहे.
- चार दहशतवाद्यांनी सुरक्षेचे दोन कडे पार केले आणि ग्रेनेड हल्ला केला.
- या हल्ल्यानंतर दोन दहशतवाद्यांना मारण्यात आले. यानंतर दहशतवादी एअरफोर्सच्या टेक्निकल एरिया आणि निवासीभागात पसार झाले.

4 - सुरक्षेचे किती मोठे अपयश
- शुक्रवारी पठाणकोटचे पोलिस अधीक्षक सलविंदरसिंग यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिस अलर्ट झाले होते.
- शुक्रवारी सायंकाळी परिसरात नाकेबंदी करण्यात आली आणि दहशतवाद्यांचा शोध सुरु झाला होता.
- संपूर्ण पंजाबमध्ये 12 तासांपूर्वीच हायअलर्ट जारी करण्यात आले होते. त्यानंतरही हल्ला झाला आहे.

5 - मोदींच्या लाहोर दौऱ्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांना खीळ घालण्याचा प्रयत्न...
- संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल जी.डी. बक्षी एका वृत्तवाहिणीसोबत झालेल्या बातचीतमध्ये म्हणाले, 'पंतप्रधानांचा 25 डिसेंबरला लाहोर दौरा झाला तेव्हापासून आम्हाला, आयएसआयएस आणि दहशतवादी हल्ला करतील ही चिंता सातावत होती. पाकिस्तानसोबतच्या संबंध सुधारण्याच्या वाटचालीत खीळ घालण्याचे काम दहशतवाद्यांकडून होणार याची भीती होतीच. पाकिस्तानला सर्वांसमोर उघडे पाडण्यासाठी दहशतवादी हल्ला करणार याची आम्हाला कल्पना होती.'
- एकदा आपण लाहोर बसयात्रेच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकले होते, ते कारगिल युद्धामुळे मागे घ्यावे लागले. पाकिस्तानसोबतच्या संबंधांचा हा पॅटर्न राहिलेला आहे.

6 - हल्ल्यात लष्कर-ए-तोएबाचा हात आहे का ?
- आयबीने 30 डिसेंबर रोजी अलर्ट जारी केला होता. नरेंद्र मोदी, संसद भवन आणि देशातील लष्करी तळांवर लष्कर-ए-तोएबा दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता वर्तवली होती.
- त्यानंतर पठाणकोटमध्ये हल्ला झाला आहे. यात लष्करचा हात असण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइडमध्ये, एक्सपर्टस काय म्हणतात..