आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Attack In Jammu News In Marathi, Indian Army

PICS: जम्मूत लष्कराच्या गणवेशातील दहशतवाद्यांचा हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- जम्मू-काश्मिरमधील कठुआमध्ये आज (शुक्रवार) पहाटे लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी एका कारवर बेछुट गोळीबार करीत एका व्यक्ती हत्या केली तर अनेकांना जखमी केले. त्यानंतर या दहशतवाद्यांनी ही कार घेऊन पळ काढला. कठुआपासून जरा अंतरावर असलेल्या खरोटमोड येथील प्रादेशक लष्कराच्या कॅम्पवरही हल्ला केला. दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये सुरू असलेला तुफान गोळीबार अजूनही सुरू आहे. यात दोन दहशतवादी ठार झाले असून एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. 
 
कारला केले टार्गेट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कठुआजवळ असलेल्या दयालाचक येथे आज पहाटे 5 च्या सुमारास ही घटना घडली. चार ते पाच दहशतवादी राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांच्या गणवेशात आले होते. त्यांनी हात दाखवून बोलेरो कारला थांबवले. गाडीत चालकासह पाच जण होते. त्यांनी या लोकांना हात वर करून जंगलाच्या दिशेने जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आणि इतर तिघे जखमी झाले. जखमींना जम्मू मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
पुढील स्लाईडवर बघा या घटनेचे जिवाचा थरकाप उडविणारे LIVE PICS....