आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमधील हिंदवाडा येथे आर्मीच्या ताफ्यावर हल्ला, 3 जवान जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हिंदवाडा येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी आर्मीच्या ताफ्याला लक्ष्य केले. हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर सांगितली जात आहे. आर्मीने संपूर्ण परिसराला वेढा टाकला असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. मंगळवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते.
संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितल्यानुसार, 'पाकिस्तानने मंगळवारी एलओसी लगतच्या पुंछ सेक्टरमध्ये 120 एमएम मोर्टार, ऑटोमॅटिक आणि इतर शस्त्रांनी मारा केला.'
- 'या गोळीबाराला भारतानेही प्रत्युत्तर दिले. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय सीमेवर 253 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. त्यात 152 वेळा एलओसीवर हल्ला झाला.'
- 'याआधी 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानकडून जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये फायरिंग झाली होती.'
- गेल्या वर्षभरात पाकिस्तानकडून 405 वेळा फायरिंग झाली आहे. त्यात 16 नागरिकांचा मृत्यू झाला तर 71 जखमी झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...