आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Pathankot : पाचव्या दहशतवाद्याला कंठस्नान, हल्ला \'जैश\'ने केल्याचा संशय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट - पंजाबमधील पठाणकोट एअरफोर्स बेसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. पहाटे तीनपासून सुरू झालेल्याया या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे. हल्ला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी पाकिस्तानात अशफाक अहमद, अब्दुल शकूर नावाच्या हँडलर्सबरोबर चर्चा केली होती असे सांगितले जात आहे.
हल्ल्याच्या आधी गुरुवारी गुरदासपूरचे निवृत्त पोलिस अधीक्षक आणि आता पोलिस असिस्टंट कमांडेटचे चार जणांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता.

पाहाटे तीन वाजेपासून पठाणकोटमध्ये काय काय झाले - UPDATES
6.30 PM: सायंकाळी 5 वाजेनंतर दहशतवाद्यांनी फायरिंग केलेले नाही.
6.20 PM: दहशतवाद्यांनी पाकिस्तानात अशफाक अहमद, अब्दुल शकूर नावाच्या हँडलर्सबरोबर चर्चा केली होती असे सांगितले जात आहे.
6.05 PM: सेक्युरिटी फोर्सेसने पठाणकोट एअरफोर्स बेसमध्ये पाचव्या दहशतवाद्याला मारण्यात आले.
5. 47 PM: डोभाल दहशतवाद्यांची नावे, फोन नंबर आणि पाकिस्तानातील त्यांच्या लोकेशनबाबत मािहती देऊ शकतात.
5. 46 PM: एनएसए अजित डोभाल पाकिस्तानला हल्ल्याशी संबंधित पुरावे देऊ शकतात.
5. 40 PM: पठाणकोटमध्ये लष्कराने दोन टँक आणि लाइट्स मागवले. अंधार झाल्यानंतरही सर्च ऑपरेशन सुरू राहू शकते.
5. 31 PM: सूत्रांच्या मते पाकिस्तानशी चर्चा करायची की नाही, याचा निर्णय पीएमओ स्वतः घेणार आहे.
5. 30 PM: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या वक्तव्याने सरकार नाराज. हल्ल्यानंतरही पाकिस्तानशी चर्चा सुरू राहणार असे जावडेकर म्हणाले होते.
4:40 PM : इंटलिजंस इनपुट असूनही हल्ला कसा झाला, याबाबत चर्चा झाली.
4:40 PM : दिल्लीत सुरू असलेली उच्च स्तरीय मिटींग संपली.
:44 PM : तिन्ही सैन्यप्रमुख आणि अजित डोभाल यांनी संरक्षण मंत्र्यांना माहिती दिली.
3:35 PM : बैठकीत राजनाथ सिंह आणि अजित डोभाल यांचीही उपस्थिती.
3:35 PM : दिल्लीत तिन्ही सैन्यप्रमुखांबरोबर उच्चस्तरीय मिटींग सुरू.
3:30 PM : संरक्षण मंत्री साऊथ ब्लॉकमध्ये पोहोचले.
3:10 PM : किरण रिजिजू म्हणाले, आमच्या गुप्तचर संस्था पंजाब पोलिसांच्या मदतीने काम करत आहेत.
2:55 PM : रात्री 12 ते 12:45 दरम्यान दहशतवाद्यांनी पाकिस्तानात तीन वेळा हँडलर्सबरोबर आणि एकदा घरच्यांशी चर्चा केली.
2:55 PM : दहशतवाद्यांचे फोन डिटेल्स इंटरसेप्ट करण्यात आले. केले.
2:44 PM : पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. के फॉरेन मिनिस्ट्री ने की आतंकी हमलों की निंदा।
2:30 PM : एअरबेसमधून स्फोटाचा आवाज आला.
2:13 PM : पठाणकोट हल्ल्यानंतर मंुबईतही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
1:50 PM : राजनाथ सिंग म्हणाले हल्ला, अपयशी ठरला. आधीच माहिती मिळाली असल्याने कमी नुकसान झाले.
1:39 PM : राहुल गांधी यांनी पठाणकोट हल्ल्याचा निषेध केला.
1:10 PM : लालू म्हणाले, ही परराष्ट्र खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्याची वेळ नाही.
1:05 PM : मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल घटनास्थळी जाणारा.
1:05 PM : पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले, आधीच माहिती मिळाली असल्याने कमी नुकसान झाले.
12:50 PM : लष्कराच्या ड्रोनच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू.
12.33 PM : ज्या ठिकाणी दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे, त्याठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे फायरिंग केली जात आहे.
12.32 PM: हेलिकॉप्टरने सर्च ऑपरेशन सुरु आहे.
12.22 PM: वृत्तवाहिन्यांच्या वृत्तानुसार एअरबेसमध्ये अजून तीन दहशतवादी असण्याची शक्यता आहे.
12.20 PM: एअरबेस जवळील गुरुद्वाऱ्यावर ग्रेनेड हल्ला झाल्याचे वृत्त आहे.
11.55 AM: काँग्रेस नेते अहमद पटेल म्हणाले, मोदींनी नवाज शरीफांची भेट घेतल्यानंतर एका आठवड्यात असा हल्ला होणे, अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे.
11.48 AM: केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले, हल्ल्याचे चोख उत्तर दिले जाईल.
11.40 AM: एअरफोर्स बेसवर पुन्हा फायरिंग सुरु झाले.
11.25 AM: वृत्तसंस्था एएनआयनुसार, सर्च ऑपरेशन अजून संपलेले नाही. 5 व्या दहशतवाद्याचा मृतदेह मिळाला.
11.20 AM: नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) टीम पठाणकोटला पोहोचली.
11.15 AM: वृत्तवाहिन्यांच्या वृत्तानुसार हल्ल्याचे इनपूट शुक्रवारीच मिळाले होते. NSG कमांडोची टीम रात्रीच पोहोचली होती.
11.01 AM: दुपारी तीन पर्यंत दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होणार. बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित राहातील.

11.00 AM: अजीत डोभाल पंतप्रधानांना हल्ल्याची माहिती देणार.
10.44 AM: आज सायंकाळी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर उच्चस्तरीय बैठक घेणार.
10.35 AM: राजनाथसिंह म्हणाले, पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांसोबत आम्हाला शांततेसह चांगल्या संबंधाची आपेक्षा आहे. मात्र, देशावर झालेला हल्ला सहन केला जाणार नाही.
10.22 AM: गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार, हल्ला करण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री 12 ते 12.45 दरम्यान पाकिस्तानातील हँडलर्ससोबत बातचीत केली.
10.15 AM: फायरिंग दरम्यान गोळी लागलेल्या एका स्थानिकाच्या मृत्यूची माहिती.
9.45 AM: काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला म्हणाले, 'हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. आम्हाला आशा आहे, की पंतप्रधान मोदी हा मुद्दा पाकिस्तानसमोर उपस्थित करतील.'
9.40 AM: न्यूज एजन्सी एएनआय नुसार, दहशतवादी पाकिस्तानच्या बहावलपूर येथून आले होते.
9.30 AM: दहशतवादी आणि लष्करादरम्यान फायरिंग सुरु. सर्च ऑपरेशन जारी.
9.15 AM: दहशतवाद्यांच्या निशाण्यावर फायटर प्लेन आणि हेलिकॉप्टर होते.
9.05 AM: NIA टीम जम्मूहून रवाना.
8.44 AM: वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, दोन दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन सुरु.
8.40 AM: एका स्थानिक नागरिकाला गोळी लागली.
8.21 AM: एअरफोर्सवर सहा जवान जखमी.
8.10 AM: दहशतवाद्यांचे मोबाइल लोकशनवरुन शंका घेतली जात आहे,की 30 डिसेंबर रोजी एसपीचे अहरण करण्यात आले ते हेच दहशतवादी होते.
8.00 AM: दहशतवादी लष्कर-ए-तोएबा किंवा जैश-ए-मोहम्मदचे असल्याचे सांगितले जात आहे.
कसा झाला हल्ला ?
- आर्मीच्या वेषात आलेले दहशतवादी सकाळी 4.30 वाजता एअरफोर्स बेसमध्ये घुसले.
- दहशतवादी फायरिंग करत एअरफोर्स स्टेशनमध्ये घुसले.
- दोन दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
- आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
- हल्लायात दोन जवान शहीद झाले आहेत.

एक दिवसापूर्वीच असिस्टंट कमाडेंटच्या अपहरणानंतर आर्मीने केले होते अलर्ट
- पठाणकोटजवळील पाकिस्तान बॉर्डरवरील नरोट जमैलसिंग परिसरातून पंजाब आर्म्ड पोलिसच्या (पीएपी) 75 बटालियनचे असिस्टंट कमांडेंट सलविंदर सिंग, त्यांचे मित्र राजेश आणि कुकचे शुक्रवारी रात्री अपहरण करण्यात आले होते.
- 4 अपहरणकर्ते आर्मीच्या वेषात होते. यामुळे पोलिस, बीएसएफ आणि आर्मीने यामध्ये दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता.
- स्क्वॅट टीम आणि अमृतसर, गुरुदासपूर येथून फोर्स मागवण्यात आली आहे.

पाच महिन्यात पहिला हल्ला
- जुलैमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यातील दीनानगर येथे दहशतवादी हल्ला झाला होता. दीड तासात सात हल्ले झाले होते.
- 20 वर्षांनंतर पंजाबमध्ये एवढा मोठा हल्ला झाला, 11 तासांच्या एन्काउंटरनंतर दहशतवाद्यांना मारण्यात आले होते.

पुढील स्लाइडमध्ये, पाहा हल्ल्यानंतर वाढवण्यात आली सुरक्षा