आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LOC तीन ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, चार दहशतवाद्यांना कंठस्नान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने रविवारी दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले. पूंछ व नौगामामधील वेगवेगळ्या पाच चकमकीत एक पोलिस शहीद झाला. सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ७ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मिनी सचिवालयाच्या इमारतीच्या आडून काही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. सचिवालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या इमारतीच्या आडून हल्ला झाला. ही घटना लष्कराच्या ९३ ब्रिगेड मुख्यालयापासून काही अंतरावर आहे. अल्ला पीरमधील एका घरात हल्लेखोरांनी आश्रय घेतला होता. त्यास घेराव करून दांपत्याची रात्री नऊच्या सुमारास सुटका करण्यात आली. घरात दडून बसलेल्या तीन अतिरेक्यांना ठार करण्यात आले, असे पोलिस महासंचालक राजेंद्र कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. त्या अगोदर चार अतिरेकी ठार झाले होते.

तीन जणांना अटक
बीएसएफने सीमा आेलांडून प्रवेश करू पाहणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. संशयास्पद हालचालींवरून त्यांना अटक करण्यात आली आहे. सांबा जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, दक्षिण काश्मीरमध्ये पुन्हा धुमश्चक्री; अनेक जखमी
बातम्या आणखी आहेत...