आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब : हल्‍लेखोरामध्‍ये एक महिलाही; दर पाच मिनिटाला फायरिंग : प्रत्‍यक्षदर्शी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्‍ल्‍यामध्‍ये जखमी झालेला युवक. - Divya Marathi
हल्‍ल्‍यामध्‍ये जखमी झालेला युवक.
गुरदासपूर (पंजाब) - गुरदासपूर येथील दीना नगर पोलिस ठाण्‍यात आज (सोमवार) पहाटे 5 वाजताच्‍या सुमारास दहशवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. हल्‍लेखोरांमध्‍ये एक महिलाही होती. हल्‍लेखोर दर पाच मिनिटांनी गोळी झाडत होते, अशी आपबती यात जखमी झालेल्‍या एका पोलिस कर्मचा-यांने सांगितली. पोलिस म्‍हणाला, ‘‘आर्मीच्‍या यूनिफॉर्ममध्‍ये काही व्‍यक्‍ती सरळ पो‍लिस ठाण्‍यात घुसल्‍या. काही कळायच्‍या आत त्‍यांनी अंधाधुंद फायरिंग करने सुरू केले.''
ठाण्‍यात घुसतास केली फायरिंग, पोलिसांना काही कळालेच नाही
एक जखमी पोलिसाने सांगितले, '' दहशतवाद्यांनी जशी फायरिंग सुरू केली तसे आम्‍ही शस्‍त्र उचलण्‍यास सुरुवात केली. दरम्‍यान, माझ्या जवळून एक गोळी गेली. मी मान वळून पाहतच होते की माझ्या खांद्यावर गोळी लागली.
दीनानगर भागात दहशत
या हल्‍लाचा प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदार असलेला जतिंदर कुमार याचे घर दीना नगर पोलिस ठाण्‍यापासून केवळ 500 मीटर दूर अंतरावर आहे. त्‍या ठिकाणाहून अचानक फायरिंगचा आवाज आला. नेमके काय झाले ते कळाले नाही. भीती वाटल असल्‍याने बाहेर आलो नाही. सकाळी 6 वाजता एका मित्राचा फोन आला. त्‍याने काय होतेय ते सांगितले. जतिंदर म्‍हणाला, “सुरुवातीला फायरिंगीचा आवाज येत होता. त्‍यानंतर पहिले पोलिस आणि नंतर आर्मीची वाहने त्‍या दिशेने जाताना दिसली.” याच भागात राहत असलेले वरिन्दर कुमार ऊर्फ विक्‍की म्‍हणाले, माझ्या आयुष्‍यात पहिलांदाच असा भयानक हल्‍ला मी पाहिला.
हल्‍लेखोर खलिस्‍तान समर्थककांचा की लश्कर-ए-तोयबा ?
अजय साहनी (इंडियन इंस्टीट्यूट फॉर कन्फ्लिक्ट मॅनेंजमेंटचे एग्जीक्यूटिव डायरेक्‍टर) यांनी divyamarathi.com ला सांगितले, 1995 नंतर पंजाबमध्‍ये झालेला हा सर्वात मोठा दहशवादी हल्‍ला आहे. काश्‍मीरमध्‍ये ज्‍या प्रमाणे लश्कर-ए-तोयबाकडून हल्‍ला केला जातो तिच पद्धत या ठिकाणी वापरली गेली. पण, दुसरीकडे खालिस्तान समर्थक असलेले अनेक नेते सध्‍या पाकिस्तानात वास्‍तव्‍यास आहेत. त्‍यांनी स्‍थानिक दहशवाद्यांच्‍या मदतीनेही हा हल्‍ला केला असेल, अशी शक्‍यताही नाकारता येत नाही. पंजाबमध्‍ये निवडणुका जवळ आल्‍या की, खलिस्‍थान समर्थक काही ना काही करतात. त्‍यांना पाकिस्तानच्‍या आयएसआयकडून मोठी मदत केली जाते. दरम्‍यान, काश्‍मीरमध्‍ये कडक सुरक्षा व्‍यवस्‍था आहे. त्‍यामुळे तिथे संधी मिळाली नाही, या ठिकाणी लश्कर-ए-तोयबाकडून हा हल्‍ला केला गेला, अशीही शक्‍यता नाकारता येत नाही. पंजाबचा हा परिसर पाकिस्तान बॉर्डरपासून केवळ 15 किमी दूर आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा हल्‍ल्‍याचे अधिक फोटो...