आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उधमपूर पोलिस ठाण्यावर अतिरेकी हल्ला, एक शहीद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उधमपूर- बीएसएफच्या ताफ्यावरील अतिरेकी हल्ल्यातून उधमपूर सावरत नाही तोच गुरुवारी रात्री बाहेरच्या बाजूला असलेल्या एका पोलिस चौकीवर पुन्हा हल्ला झाला. यात एका विशेष पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. एका नागरिकासह दोन जण जखमी झाले आहेत. जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार अतिरेक्यांच्या एका टोळक्याने वसंतगडच्या डोंगराळ भागात रात्री पावणेदहा वाजता हल्ला केला. तैनात सुरक्षा रक्षकांनी निकराने प्रतिकार केला. यात संधूकुमार नामक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. दुसरे एसपीओ गुल मोहंमद जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...