आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:अाठ महिन्यांनी पुन्हा ‘उरी’प्रमाणे लष्करी छावणीवर अतिरेकी हल्ला; कॅप्टनसह 3जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांनी गुरुवारी पहाटे लष्कराच्या छावणीवर आत्मघाती हल्ला केला. यात एक कॅप्टन, एक जेसीओ आणि एक जवान असे तीन जण शहीद झाले. लष्कराच्या प्रत्युत्तरात दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. हा हल्ला उरी हल्ल्याच्या आठ महिन्यांनी झाला आहे.   

गुरुवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास अतिरेक्यांनी पांजगम कॅम्पच्या गेटवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. अंधाराचा फायदा उचलून त्यांना छावणीत घुसायचे होते. मात्र, गेट पोस्टवरील जवानांनी गोळीबार करत दोन अतिरेक्यांना ठार मारले. लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांच्यानुसार हल्ल्यात पाच जवान जखमी झाले आहेत. त्यांना विमानाने लष्करी तळावरील रुग्णालयात पोहोचवण्यात आले. अतिरेकी नियंत्रण रेषेवरील तारेचे कुंपण तोडून घुसल्याचे मानले जाते. गतवर्षी सप्टेंबरमध्ये उरी येथे लष्करी छावणीवरील अतिरेकी हल्ल्यात २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर लष्कराच्या छावणीवर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे.
 
चकमक सुरू असताना जवानांवर दगडफेक 
चकमक संपल्यानंतर तिसऱ्या अतिरेक्याला शोधण्यासाठी सर्च आॅपरेशन राबवले गेले. यादरम्यान स्थानिकांनी जवानांना चकमकीच्या ठिकाणापर्यंत जाऊ देण्यात अडथळे आणले. सशस्त्र सैनिकांच्या वाहनांवर त्रागपोरा गावाजवळ लोकांनी दगडफेक केली. 

पहाटे 4 वाजता घुसले दहशतवादी...
कुपवाड्यामधील पंजगाम येथील आर्मी कॅम्पवर आज (गुरुवारी) पहाटे 4 वाजेच्या सुमारास 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला. लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून दोन दहशतवादी कॅम्पमध्ये लपून बसले आहे. जवानांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली असून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

पंजगाम हे श्रीनगरपासून 87 किलोमीटर अंतरावर आहे. तर पाकव्याप्त काश्मीरची (पीओके) राजधानीपासून 74 किलोमीटर अंतरावर आहे.

पोटनिवडणुकीच्या नंतर काश्मीर खोर्‍यात वाढला तणाव...
- श्रीनगरमध्ये 9 एप्रिलला झालेल्या पोटनिवडणुकीनंतर काश्मीर खोर्‍यात तणाव वाढला आहे. निवडणुकीच्यादरम्यान झालेल्या दंगलीत जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर 32 मतदान केंद्रावर रीपोलिंग घेण्यात आले होते.
- 24 एप्रिलला पुलवामा जिल्ह्यांत सोमवारी पीडीपीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी डार यांच्यावर दहशतवाद्यांनी फायरिंग  केली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
- 17 एप्रिलला दहशतवाद्यांनी नॅशनल कॉन्फरन्सशी संबंधित एका वकीलाची शोपियां जिल्ह्यात हत्या केली होती.
- 26 मार्चला कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. सीआरपीएफ कॅम्पला दहशतवाद्यांनी टार्गेट केले होते.
- 23 फेब्रुवारीला शोपियामध्ये आर्मीच्या पेट्रोलिंग पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 3 जवान शहीद झाले होते.
- फेब्रुवारीमध्ये हंदवाडा येथे झालेल्या एन्काउंटरमध्ये एक मेजर सतीश दहिया आणि 3 जवान शहीद झाले होते.

काश्मिरात ट्विटर,फेसबुकसह 22 संकेतस्थळांवर घातली बंदी... वाचा पुढील स्लाइडवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...