आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Attack On Bus And Police Station In Gurdaspur Punjab

#GurdaspurAttack एसपीसह 8 पोलिस शहीद, 3 दहशतवादी ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुदासपूर - पाकिस्तान बॉर्डरपासून अवघ्या 15 किमी अंतरावर असलेल्या पंजाबच्या गुरदासपूरमध्ये आज (सोमवारी) सकाळी दहशतवादी हल्ला झाला. पंजाबमध्‍ये 20 वर्षांनंतर अशा प्रकारचा दहशवादी हल्‍ला झाला. यामध्‍ये एका एसपीसह सात पोलिस शहिद झाले तर दोन कैदी आणि 3 सामान्‍य नागरिकही यात ठार झाले. दरम्‍यान, तीन दहशवाद्यांनाही पोलिस आणि सैनिकांनी कंठस्‍थान घातले. आता चकमक थांबली असून, परिसरात दहशावाद्यांची शोध मोहीम सुरू आहे.
लष्कराच्या गणवेशात आलेल्या चार दहशतवाद्यांनी आधी जम्मूच्या कटरा येथे जाणाऱ्या बसवर हल्ला केला. त्यानंतर गोळीबार करतच त्यांनी दीनानगर पोलिस ठाण्यात प्रवेश केला. तसेच एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यातही यश आले असून, दहा जण जखमी आहेत. गुप्तचर यंत्रणांच्या मते हे दहशतवादी पाकिस्तानच्या नारोवलमधून आलेले असल्याची शक्यता आहे. सकाळी पाच वाजता हा हल्‍ला सुरू झाला. अजूनही थोड्या थोड्या वेळाने फायरिंग सुरूच आहे. हल्‍लेखोरांमध्‍ये एका महिलेचाही समावेश असल्‍याचे समजते. दहशवाद्यांनी रेल्‍वे स्‍थानकावरही बॉम्‍ब ठेवले होते. पण, ते निकामी करण्‍यास यश आले.
UPDATES

- गुरुदासपूरच्या घटनेनंतर संसदेची सुरक्षा वाढवण्यात आली.
- महाराष्ट्रातही हाय अलर्ट, मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ.
- पठानकोट-अमृतसर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर आढळलेले बॉम्ब डिफ्युज करण्यासाठी पोहोचले लष्कराचे जवान.
- गुरुदासपूरच्या घटनेनंतर जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेत वाढ. सांबामध्ये हाय अलर्ट.
- पंजाबमध्ये सर्व रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली. सर्व रेल्वे, ट्रॅकची पोलिसांकडून तपासणी.
- पंजाबला येणाऱ्य आणि जाणाऱ्या बस, वाहनांची तपासणी सुरू.
- दहशतवाद्यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न, ऑपरेशन दीर्घकाळ चालण्याची शक्यता.
- लोकसभेत गुरुदासपूरच्या हल्ल्याचा निषेध. ऑपरेशन संपताच केंद्रीय गृहमंत्री संसदेत निवेदन देणार, सभापतींची माहिती.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू यांच्याबरोबर उच्चस्तरीय बैठकीत चर्चा केली.
- SAD चे नरेश गुजराल म्हणाले, पाकिस्तान काहीतरी गडबड करणार याची शक्यता होती. मात्र, त्यांचे लक्ष्य काय असेल याचा अंदाज नव्हता. गुप्तचर संस्था केवळ सीमेवरील हालचालींबाबत इशारा देऊ शकतात. लोकेशन आणि कटाबद्दल त्यांना माहिती कशी असणार.
- पंजाबच्या गुरुदासपूरमधील हल्ल्याबाबत विरोधकांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल. सपा नेते नरेश अग्रवाल म्हणाले, पंतप्रधान एकिकडे पाकिस्तानशी चर्चेची तयारी करत आहेत, आणि पाकिस्तान देशात दहशतवादी पाठवत आहे. पंजाबमध्ये झालेला दहशतवादी हल्ला गुप्तचर विभागाचे अपयश आहे.
- राजनाथ सिंह म्हणाले, स्थिती नियंत्रणात, ऑपरेशन सुरू आहे. आपल्याला यश मिळेल.
- केंद्रीय गृहराज्‍य मंत्री किरेन रिजेजू म्हणाले, अद्याप कोणालाही बंदी बनवल्याची माहिती नाही. सुरक्षा दलांना सज्ज राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत. आधी काही पोलिसांना बंदी बनवल्याची माहिती मिळाली होती.
- दिल्लीत हाय अलर्ट, महाराष्ट्रातही अलर्ट जारी
- संसदेत निवेदन देणार राजनाथ सिंह
- पंतप्रधान स्वतः हल्ल्यावर लक्ष्य ठेवून.
- दीनानगर पोलिस ठाण्याबाहेर फायरिंग सुरू.
- आर्मीने मोहीम घेतली हाती. पठानकोट आर्मी कँट आणि जम्मूहून आर्मी कमांडोजना बोलावले.
पोलिस ठाण्यातून करताहेत ग्रेनेड हल्ला
बस स्थानकावर केलेल्या फायरिंगनंतर हल्लेखोरांनी पोलिस ठाण्यासमोर अल्टो कार उभी करून फायरिंग केले. त्यात कारमधून बाहेर पडताच दहशतवादी थेट पोलिस ठाण्यात घुसले. हल्लेखोरांनी एकच अंधाधुंद गोळी बार केला. सध्या हे दहशतवादी पोलिस ठाण्यातून फायरींग करत आहेत. वाघा बॉर्डरपासून किमी अंतरावर हा हल्ला झाला आहे. दरम्यान अमृतसर-पठानकोट रेल्वे ट्रॅकवर 5 बॉम्ब सापडल्याची माहितीही मिळाली आहे.
कुठे आहे गुरुदासपुर?
गुरुदासपुर पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. येथून अटारीची वाघा बॉर्डर 100 किलोमीटर आणि जम्मूतील एलओसीचे अंतर 60 किलोमीटर आहे.

एनएसएने मोदींना दिली माहिती
गृह मंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला असल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, एनएसए अजित डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सपूर्ण घटनेबाबत माहिती दिली. दरम्यान, गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी बीएसएफचे महासंचालक डी.के. पाठक यांना भारत-पाक सीमेवर गस्त वाढवण्यास सांगितले आहे.
एका दिवसापूर्वी मिळाला होता अलर्ट
पंजाब पोलिसांनी गुप्तचर संस्थांकडून एक दिवस आधीच अलर्ट पाठवण्यात आला होता. पंजाब पोलिसांना सीमेपलिकडून काही दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा इशारा देण्यात आला होता. दहशतवादी, शाळा आणि सरकारी कार्यालयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात असेही सांगण्यात आले होते.
लष्कराचे कमांडो परिसरात पोहोचले आहेत. मुंबई हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजवलेल्या एनएसजीलाही अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमरनाथ यात्रेलाही दहशतवादी लक्ष्य करू शकतात असेही सांगितले जात आहे. हल्ल्याची पद्धत आत्मघातकी हल्ल्याप्रमाणे आहे.
केव्हा अाणि कसा झाला हल्ला ?
-सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार लष्कराच्या वेशात आलेले 4 दहशतवादी आधी गुरुदासपूरच्या बस टर्मिनलवर सकाळी पाच वाजता पोहोचले. अमरनाथचे यात्रेकरू हे त्यांचे लक्ष्य होते.
- पहाटे 5:30 वाजता दहशतवादी कटराकडे जाणाऱ्या बसमध्ये चढले. बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. अनेक अमरनाथ यात्रेकरू हे कटरा मार्गे प्रवास करतात.
- दहशतवाद्यांनी केलेल्या फायरिंगमध्ये बसमधील 7 जण जखमी झाले. एक जण जागीच ठार झाला.
- दहशतवादी एका कारमध्ये होते. बस स्थानकापासून काही अंतरावरच असलेल्या दीनानगर पोलिस ठाण्यात ते पोहोचले. आत असलेल्या पोलिसांवर त्यांनी फायरिंग केले. या ठाण्याला लागूच पोलिस अधिकाऱ्यांची घरेही आहेत.
- सध्या दहशतवादी ग्राऊंड फ्लोअरवर असून ते आतून हँड ग्रेनेडचा हल्ला करत आहेत. याठिकाणी 2 पोलिस होमगार्ड फायरिंगमध्ये शहीद झाले आहेत.
- दोन जखमींचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
सध्याची स्थिती..
- दीनानगर पोलिस ठाण्याबाहेर राज्य पोलिस दल आणि दहशतवादी यांच्यात फायरिंग सुरू आहे.
- सध्या लष्कराने परिस्थितीवर ताबा घेतला आहे. पठानकोट आर्मी कँट आणि जम्मूमधून आर्मी कमांडो बोलवण्यात आले आहेत.
- अमृतसर आणि दिल्ली स्थित एनएसजीच्या बेस वर कमांडोंना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली. बीएसएफलाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
- गुरुदासपूरमध्ये सर्व शाळा कॉलेज बंद करण्यात आले आहेत.
पढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS.... पुढील स्लाईडवर बघा घटनास्थळाचा व्हिडिओ....