आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Attack On Jammu Police, Military; 10 Died

जम्मूत पोलिस, लष्करावर दहशतवादी हल्ला; 10 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू/दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या कठुआ आणि सांबा सेक्टरमध्ये लष्करी वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी गुरुवारी सकाळी केलेल्या दुहेरी हल्ल्यात लेफ्टनंट कर्नल विक्रमजिसिंग आणि दोन जवान तसेच चार पोलिस शहीद झाले. दोन नागरिकांचाही यात मृत्यू झाला. कर्नल ए. उथायांसह सहा जवान जखमी आहेत. दरम्यान, रात्री उशिरा उपचारादरम्यान आणखी एका जवानाचा मृत्यू झाला.


हल्ल्यानंतर आठ तास चाललेल्या भयंकर चकमकीनंतर तीन दहशतवादी मारले गेले. हे तिघेही पाकलगतची आंतरराष्‍ट्रीय सीमा रेषा ओलांडून आल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या अमेरिका दौ-यावर असलेले पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बुधवारी म्हटले होते. दुस-याच दिवशी हा हल्ला झाला. शोहादा ब्रिगेड या दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. अशा भ्याड हल्ल्यांना भीक न घालता चर्चा केली जाईल, असे डॉ. यांनी म्हटले आहे. रविवारी सिंग-शरीफ यांच्यात चर्चा होत आहे. भाजपचे यशवंत सिन्हा, प्रकाश जावडेकर यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर टीका केली आहे.
08 तास लष्करी कारवाई
03 अतिरेक्यांचा खात्मा
07 पोलिस व जवान शहीद
02 नागरिकांचा मृत्यू


लष्करी वेशात
आले दहशतवादी

पहिला हल्ला : सकाळी पावणेसातच्या सुमारास हिरानगर पोलिस चौकीवर
‘आयबी’नुसार बुधवारी रात्री कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्‍ट्रीय सीमारेषेवरून घुसखोर भारतात आले. तीन दहशतवादी आॅटो रिक्षाने हिरानगर भागातील पोलिस चौकीजवळ पोहोचले. सीमेपासून केवळ सात किमी अंतरावर ही चौकी आहे. सकाळी पावणेसातच्या सुमारास दहशतवाद्यांनी चौकीवर हल्ला केला. यात चार पोलिस शहीद झाले. या वेळी एक दुकानदारही मारला गेला.


दुसरा हल्ला : सकाळी 8 वाजता सांबा भागातील लष्करी तळावर
पोलिस चौकीवर हल्ला करून दहशतवाद्यांनी तिथे उभ्या ट्रकच्या सहचालकास गोळी घातली. चालकाला बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी ट्रकने सांबातील लष्करी तळ गाठला. गेटवर रक्षकाला गोळी घातली. नंतर मेसपर्यंत पोहोचले आणि गोळीबार केला. यात लेफ्टनंट कर्नल विक्रमजितसिंग आणि दोन जवान शहीद झाले. कर्नल ए. उथाया यांचा खांदा व छातीत गोळी लागली.


... तर निर्लज्ज देश ठरू :आम्ही नेहमी हल्ल्यानंतर रक्षणार्थ कारवाई करत असतो. म्हणूनच पाकचे फावते. अजूनही चर्चा सुरू ठेवली तर निर्लज्ज देश म्हणून भारत ओळखला जाईल. जी. डी. बक्षी, संरक्षणतज्ज्ञ
चर्चा करा, पण छावण्या उद्ध्वस्त करा : चर्चेत वावगे काही नाही. मात्र, सरकारने पाक हद्दीतील दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त करण्याचे धाडस दाखवावे. नाही तर ही चर्चा फोलच आहे.भरत वर्मा, संरक्षणतज्ज्ञ