आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Entered In Pathankot Air Base Path Found

दहशतवादी नाल्यातून घुसले एअरबेसमध्ये, बिल्डिंगच्या आडून सुरु केली होती फायरिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाल्याच्या मार्गाने दहशतवादी एअरबेसपर्यंत पोहोचले - Divya Marathi
नाल्याच्या मार्गाने दहशतवादी एअरबेसपर्यंत पोहोचले
पठाणकोट - दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या तळात घुसण्यासाठी नाल्याचा मार्ग निवडला होता. त्यानंतर त्यांनी अर्धा किलोमीटर वरील एका दुमजली इमारतीत घुसून हल्ला केला. हा नाला पठाणकोट-नौशहराला जाणाऱ्या अकालगड मार्गाला जाऊन मिळतो. येथेच असिस्टंट कमांडेंट सलविंदर सिंह यांची गाडी जप्त करण्यात आली होती.

चारही बाजूंनी 15 ते 18 फूट भिंती
नाला एअरफोर्सच्या संरक्षक भिंतीजवळून एअरबेसमध्ये जातो. जिथे संरक्षण विभागाच्या पोलिसांच्या कुटुंबांचा निवासी भाग आहे. भास्करच्या प्रतिनिधीने चौकशी केली तेव्हा तिथे तैनात लष्कराचे आणि सीआरपीएफच्या जवानांनी सांगितले, 20 किलोमीटर पसरलेल्या एरियात एअरफोर्सच्या चारही बाजूंनी 15 ते 18 फूट उंचीच्या भिंती आहेत, आणि त्यानंतर तारा लावलेल्या आहेत.
लोखंडी सळया कापल्या
संरक्षक भिंतीवरुन आत दाखल होण्याची शक्यता नसल्यात जमा आहे. कारण सगळीकडे सर्चिंग टॉवर आहेत, त्यावरुन सर्वत्र नजर ठेवली जाते. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांनी अकालगढच्या बरोबर समोर निघणाऱ्या नाल्यातूनच आत प्रवेश करण्याचा मार्ग निवडला असावा. नाल्याच्या आतील भागात लोखंडी सळया कापलेल्या आहेत. त्याशिवाय पुढे झाडी आहे.

बिल्डिंगच्या आडून केली फायरिंग
झाडांच्या मागे लपून दहशतवादी बिल्डिंगपर्यंत पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी बिल्डिंगच्या आडून फायरिंग सुरु केले. दोन दिवस दहशतवादी एकाच बिल्डिंगमध्ये एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाऊन फायरिंग करत होते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो...