आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Infiltration Stopped Indian Army In Kashmir

दहशतवाद्यांचे काश्मीर भागातील घुसखोरीचे मनसुबे भारतीय लष्कराने पाडले हाणून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - सीमापार दहशतवाद्यांचे काश्मीर भागातील घुसखोरीचे मनसुबे भारतीय लष्कराने पूर्णपणे हाणून पाडले आणि सर्व घुसखोरांचा खात्मा केला. लष्करी इतिहासात 1999 च्या कारगिलनंतर फत्ते केलेली ही भारतीय जवानांची सर्वात मोठी दुसरी मोहीम आहे. ही मोहीम नियंत्रण रेषेवर पंधरा दिवसांपासून सुरू होती.


केरन क्षेत्रातील शालभाटी गावातील मोहीम फत्ते झाल्याचे लष्करप्रमुख विक्रमसिंग यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पंधरा दिवसांपासून तपाससत्र सुरू होते. त्याचबरोबर दहशतवाद्यांसोबत धुमश्चक्रीही सुरू होती. आता ही मोहीम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण घुसखोरीसाठी क्षेत्रात दडलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. धडक कारवाईत आठ दहशतवाद्यांचा सफाया झाला. त्यांच्याकडून 59 हत्यारे, त्यात 18 एके रायफल्स व इतर शस्त्रे जप्त केली. लवकरच हेरगिरीशी संबंधित मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे आव्हानांचा योग्य पद्धतीने मुकाबला करता येईल, असे लष्कराच्या उत्तर विभागाचे लेफ्टनंट जनरल संजीव छाछरा यांनी पत्रकारांना सांगितले. केरनमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न होता. त्याला पाकिस्तानी लष्कराचा पाठिंबा असावा, असा संशय आहे. पाकिस्तानच्या विशेष दलाकडून ही फूस आहे. भारताने सीमारेषेचे काटेकोरपणे पालन केले आहे. त्याचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी पाकिस्ताननेही काळजी घेतली पाहिजे, असे छाछरा यांनी सांगितले. ते सध्या चार दिवसांच्या काश्मीर दौ-यावर आहेत.


नेमके किती दहशतवादी ?
केरन क्षेत्रात 30-40 दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे गेल्या 20 ते 30 दिवसांपासून ते मिळेल त्या ठिकाणी दडून बसले होते.


मुबलक रसद : दहशतवाद्यांकडे संवादाची साधने, रात्रीच्या वेळी वापरण्यात येणारी उपकरणे आणि खाण्यापिण्याची मुबलक रसद होती. रेशनही असल्याने त्यांनी 20 ते 30 दिवसांपर्यंत तग धरली.
नाल्यात दबा : पाकव्याप्त काश्मीरमध्ये 300 ते 400 मीटर आत एका नाल्यात हे दहशतवादी दडून बसले होते. तेथे 30 ते 40 दहशतवादी दबा धरून होते. काश्मीरमधून पाकिस्तानला जाणारी ही वाहिनी आहे.


पाकिस्तानचा हात-लष्करप्रमुख
केरन भागातील घुसखोरीची घटना म्हणजे केवळ 1999 च्या कारगिल घटनेचे दुसरे नाट्य नाही. किंबहुना घुसखोरीला पाकिस्तानच्या लष्कराची फूस असावी, असे लष्करप्रमुख विक्रमसिंग यांनी मंगळवारी म्हटले. बहुतेक प्रसारमाध्यमांनी घटनेचा उल्लेख घुसखोरी असा केला. मात्र दहशतवाद्यांनी भारताच्या कोणत्याही प्रदेशावर ताबा मिळवलेला नव्हता, असे सिंग यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर अशी दहशतवादी कृती पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय हवाई दलाच्या संचलनात सिंग सहभागी झाले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पाकिस्तानवर तोफ डागली.