आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरच्या बांदीपोरात लश्करच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान; चकमक अजुनही सुरूच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल) - Divya Marathi
(फाइल)
श्रीनगर - काश्मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी रविवारी सकाळी दोन हशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ते दोघेही लश्कर ए-तोयबाचे सदस्य होते. घटनास्थळावरून ग्रेनेड, रायफल आणि पाकिस्तानी चलन जप्त करण्यात आले आहेत. सुरुवातीला पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार मारण्यात आले. तेव्हाच आणखी दोन दहशतवादी लपल्याचे कळाले. त्यांना आत्मसमर्पणाचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्या दोघांनी गोळीबार केल्याने सुरक्षा रक्षकांना उत्तर द्यावे लागले. यात दुसरा दहशतवादी ठार झाला. लष्कराचे 9 पॅरा, सीआरपीएफ, जम्मू-काश्मिर पोलिस आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपने या उर्वरीत दहशतवाद्यास घेरले आहे. तसेच ही चकमक अजुनही सुरूच आहे.
 
 
एक पाकिस्तानी, दुसरा स्थानिक
- जम्मू-कश्मिरचे पोलिस महासंचालक एसपी वैद यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ठार झालेला एक दहशतवादी पाकिस्तानी तर दुसरा स्थानिक होता. पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव अली उर्फ अबु माज असे होते. तर स्थानिक दहशतवाद्याचे नाव नसरुल्लाह मीर असे होते. हे दोघेही लश्कर ए तोयबाचे सदस्य होते. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच बारामुल्ला येथे जैश-ए-मोहम्मदचा कमांडर उमर खालिद ठार झाला. गेल्या आठवड्यात बीएसएफ कॅम्पवर झालेल्या हल्ल्याचा तो सुत्रधार होता. त्याच दिवशी इतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. 
बातम्या आणखी आहेत...