आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Living Near President's Ancestral House In West Bengal.

पंतप्रधानांपाठोपाठ राष्ट्रपतींच्या सुरक्षेतही त्रुटी, वडिलोपार्जित घराजवळच राहत होता दहशतवादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीरभूम - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात ग्रेडेड आढळल्यानंतर आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सुरक्षेतही त्रुटी आढळून आल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वी दुर्गा पुजेमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती आपल्या वडिलोपार्जित गावी गेले होते. तेथील त्यांच्या घराजवळच दहशतवादी कौसर याचे घर होते. कौसर पश्चिम बंगालच्या बर्दवान जिल्ह्यातील खागराबड स्फोटातील आरोपी आहे. पण सुरक्षा संस्थांना याबाबत माहिती नव्हती. स्फोटानंतर मुखर्जी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कर्णहारमध्ये परोटा गावात राष्ट्रपतींचे वडिलोपार्जित घर आहे. त्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावर दक्षिण निमरा गाव आहे. तेथे दहशतवादी कौसर त्याच्या नातेवाईकांबरोबर राहत होता. खागराबड स्फोटानंतर सीआयडीने त्याच भरपूर शोध घेतला. पोलिसांच्या मते स्फोटानंतर तो लगेचच फरार झाला होता. पोलिसांनी गुरुवारी स्थानिक दुकानदार सूकूल शेख याची चौकशी केली. पोलिसांना तपासात एक सुरू असलेले समिकार्ड मिळाले होते. त्यानंतर कर्णहार स्फोटातील आरोपींबाबत माहिती मिळाली. 27 आणि 28 सप्टेंबरला या सिममधून सुमारे 16 कॉल करण्यात आले होते. दुसरा दहशतवादी शकील अहमदला हे कॉल करण्यात आले होते. शेख अहमदचा स्फोटात मृत्यू झाला होता.

राष्ट्रपतींचे पुत्र आणि काँग्रेस खासदार अभिजीत मुखर्जी यांनी एनआयएकडे स्फोटाच्या तपासाची मागणी केली आहे. हा गंभीर विषय असून आरोपी आपल्या घरापासून एवढ्या जवळ राहत होता यावर विश्वास बसत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथे राष्ट्रपती चार दिवस राहिले होते.

पुढे पाहा, दुर्गापुजेदरम्यान प्रणव मुखर्जी यांचे वडिलोपार्जित घरातील फोटो