आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist May Attack On Amarnath Fair, Centre Warne

अमरनाथ यात्रेला अतिरेकी हल्ल्याचा धोका; केंद्राचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर/नवी दिल्ली- अमरनाथ यात्रा दहा दिवसांवर येऊन ठेपली असतानाच दोन महिने चालणा-या या यात्रेला अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याचा इशारा केंद्र व जम्मू काश्मीर सरकारने दिला आहे. तथापि, यात्रामार्गावर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात येत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली. हिमालयात 13,500 फूट उंचीवर असलेल्या अमरनाथची यात्रा 28 जूनपासून सुरू होत आहे. यात्रेच्या मार्गात घातपात घडवण्याचा अतिरेक्यांचा डाव असल्याचे लष्करानेही स्पष्ट केले होते. त्यानंतर राज्य सरकारनेही तसा इशारा दिला. गतवर्षी 6.2 लाख भाविकांनी अमरनाथाचे दर्शन घेतले होते. मागील दशकात तीन वेळा यात्रेवर अतिरेकी हल्ला झाला होता. सन 2000, 2001 आणि 2002 मध्ये झालेल्या या हल्ल्यांत 36 यात्रेकरूंसह अनेक जण मृत्यूमुखी पडले होते.