आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी नावेदची उद्या लाय डिटेक्टर टेस्ट; कोर्टाने दिली परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच गाडीतून नावेदला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. - Divya Marathi
याच गाडीतून नावेदला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले.
नवी दिल्ली - उधमपूरमध्‍ये पकडलेला पाकिस्‍तानी दहशतवादी मोहम्मद नावेद ऊर्फ उस्मान याला आज (सोमवार) दिल्लीच्‍या पटियाला हाउस कोर्टात हजर करण्‍यात आले. दरम्‍यान, नावेद याची लाय डिटेक्टर टेस्ट करण्‍याची परवानगी कोर्टाने दिली. या चाचणीसोबत मंगळवारी (दि.18) सीजीओ कॉम्प्लेक्समध्‍ये सकाळी 11 वाजता त्‍याची पॉलिग्राफी चाचणीही होणार आहे.

नावेद याला कोर्टात हजर करण्‍यासाठी एनआयएने जम्मू-कश्मीरवरून विमानाने दिल्‍लीला आणले. दरम्‍यान, एका इंग्रजी वृत्‍तपत्राच्‍या बातमीनुसार, बीएसएफच्‍या बसवर हल्‍ला करण्‍यापूर्वी नावेदला पांढ-या रंगाची एक गोळी खाण्‍याचे सां‍गतले होते. त्‍यामुळे त्‍याचे संतुलन बिघडले. पुढे ग्रामस्‍थांनी त्‍याला पकडले.
लष्‍कर-ए-तोयबाच्‍या नेत्‍यांना ठार मारणार
नावेदने तपास यंत्रणांना सांगितले, फैसलाबाद येथे लष्कर-ए-तोयबाशी संबंधित एका बशीर नावाच्‍या मौलवीने मला पाहिले. त्याने माझ्या डोक्यात जेहादी बनण्‍याचे खूळ भरवले. दरम्‍यान, पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये ट्रेनिंग देण्यात आले. लष्करने त्याला भारतात विशेषतः काश्मिरमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराचे व्हीडिओ दाखवले. त्यानंतर त्याला तीन प्रकारचे प्रशिक्षण दिले. फिजिकल फिटनेस, दुसरे हत्यार चालविणे आणि तिसरा आत्मघाती हल्ला करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर २ जून रोजी त्याला भारतात पाठविले. दरम्‍यान, आपल्‍याला भारतात पाठवणा-यांना आपण पाकिस्‍तानात जाऊन मारू इच्छितो, असे नावेदने सांगितले.
पाचवी शिकलेल्‍या नावेदचे आयुष्‍यच बदलले
दहशतवादी होण्‍यापूर्वी नावेदनचे आयुष्‍य खूप वेगळे होते. त्‍याच्‍या आयुष्‍यात कुठलेच ध्‍येय नव्‍ह‍ते. संथ गतीने तो आपले जीवन जगत होता. पण, जुगार खेळण्‍यासाठी त्‍याने एकदा घरात चोरी केली होती. त्‍यावेळी तो पकडला गेला होता. दरम्‍यान, एका मौलवीने त्‍याला पाहिले आणि जिहादी केले. त्याला भारतात येण्यासाठी लष्कर-ए-तोयबाकडून 50 हजार रुपये देण्यात आले. त्यातील सर्व पैसे दहशतवादी अबू कासिमने ठेवले आणि फक्त खर्चासाठी दोन हजार रुपये नावेदला दिल्‍याचे त्‍याने सांगितले.

नावेद पकडला गेल्‍याने हाफिज अस्‍वस्‍थ

जम्मू-कश्मीरच्‍या उधमपूरमध्‍ये बीएसएफच्‍या जवानांवर हल्‍ला करणारा नावेद पकडला गेल्‍याने जमात उद-दावाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद अस्‍वस्‍थ झाला आहे. या बाबत त्‍याने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी गुप्‍तचर संघटना आयएसआयएसच्‍या अधिका-यांसोबत चर्चा केली.
तपास अधिका-यांची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न
नावेद हा दरवेळी मुद्दाहून वेगवेगळी माहिती देत आहे. त्‍यातून तपास अधिका-यांची दिशाभूल करण्‍याचा त्‍याचा उद्देश स्‍पष्‍ट झाला आहे. मात्र, या चाचणीमुळे योग्‍य माहिती मिळण्‍यास मदत होणार आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज....