फोटो : पाकिस्तानात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणा-या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान जमात एहरार संघटनेचा प्रवक्ता एहसानुल्लाह एहसान.
नवी दिल्ली - वाघा बॉर्डरवर पाकिस्तानच्या हद्दीत रविवारी आत्मघातली हल्ला घडवणा-या दहशतवादी संघटनेने आता भारत आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना धमकी दिली आहे. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी संघटना तहरीक ए तालिबान पाकिस्तान जमात एहरार चे प्रवक्ते एहसानुल्लाह एहसान यांनी सोमवारी ट्वीटरवर पोस्ट केले की, तुम्ही (मोदी) हजारो मुस्लीमांचे मारेकरी आहेत. आम्ही काश्मीर आणि गुजरातच्या निर्दोषांचा बदला घेऊ.
रविवारचा हल्ला पाकिस्तान आणि भारत दोन्ही सरकारांना संदेश देण्यासाठी असल्याचे एहसानने म्हटले आहे. हाफीज हनिफुल्लाह नावाच्या व्यक्तीने हा स्फोट घडवला, असेही त्याने सांगितले. या संघटनेबरोबरच तहरीक ए तालिबान पाकिस्तानच्या मेहर मेहसूद गटानेही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पण तज्ज्ञांच्या मते यात जमात एहरारचाच सहभाग आहे. इतर दोन संघटनांमध्ये असा हल्ला करण्याची कुवत नसल्याचे त्यांचे दावे खरे नसल्याचेही एहसानने म्हटले आहे. या हल्ल्याची योजना जमात एहरारच्या मुख्यालयात तयार करण्यात आली होती, असेही तो म्हणाला.
पाकिस्तानच्या दहशतवाद प्रबावित उत्तर पश्चम भागातून काम करणा-या अनेक दहशतवादी संघटना भारतासाठी डोकेदुखी ठरत आहेत. नुकतीच
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या संघटनांबाबत आढावा घेतला.
तहरीक ए तालिबान पाकिस्तान जमात एहरार म्हणजे नेमके काय?
या संघटनेचा पाया रचणारा म्हणजे संघटनेचा प्रमुख मौलाना कासीम आहे. ही संघटना सीरिया आणि
इराकमध्ये पाय पसरणारी ISIS आणि तिचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी यांच्या जवळची असल्याचे सांगितले जाते. संघटनेचा मुख्य कमांडर पत्रकाराचा जिहादी बनलेला उमर खालीद खुरासानी आहे. पाकिस्तानात शरियत कायदा लागू करण्याची त्याची इच्छा आहे. त्याशिवाय पाकिस्तानात अण्वस्त्रांवर ताबा मिळवून जगभरात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचीही त्याची इच्छा आहे. फेब्रुवारी महिन्यात उमर खालीदने 23 पाकिस्तानी सैनिकांचे शीर कापले होते.
पुढील स्लाइडवर वाचा, कोलकाता विमानतळावर हल्ल्याच्या बातमीनंतर नौदलाने वायूदलाने विमाने
रविवारी वाघा बॉर्डरवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतानेही सुरक्षेत वाढ केली आहे.
नवी दिल्ली - मुंबईप्रमाणेच कोलकाता येथेही दहशतवादी संघटना समुद्रीमार्गाने हल्ला करण्याची शक्यता असल्याचा अलर्ट सैन्याला मिळाला होता. त्यानंतर नौदलाने मंगळवारी दोन लढाऊ नौका त्याठिकाणाहून हटवल्या. नौदलाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या नौका सोमवारीच खिदिरपूर येथे पर्यटकांना पाहण्यासाठी आणण्यातच आल्या होत्या. दोन्ही नौका 7 नोव्हेंबरपर्यंत येथे राहणार होत्या. अलर्टमुळे आयएनएस खुखरी आणि आयएनएस सुमित्रा यांना परत बोलवण्यात आले. तसेच कोलकाता विमानतळ आणि महत्त्वाच्या ठिकाणांसंदर्भातही अलर्ट जारी करण्यात आला होता. संरक्षण मंत्रालयाने मात्र ही जहाजे हटवण्यामागे दुसरे कारण असल्याचे सांगितले.