आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपवाडाच्या जंगलातून अतिरेक्यांचे पुन्हा पलायन, लष्कराला चकवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या एका गटाने सुरक्षा दलास पुन्हा एकदा चकवा दिला. कुपवाडाच्या जंगलात गेल्या आठ दिवसांपासून अतिरेकी दडून बसले होते. परंतु शुक्रवारी त्यांनी पुन्हा यशस्वी पलायन केले.

लष्कराने अतिरेक्यांवर कारवाई करण्यासाठी हेलिकॉप्टरचीदेखील मदत घेतली होती. त्यानंतरही अतिरेकी त्यांच्या हाती लागले नाहीत. मंगळवारी कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. तो हाच दहशतवादी गट होता. त्या घटनेत पाच जवान जखमी झाले होते. लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी घूसखोरी करून जंगलात दडून बसले आहेत, अशी माहिती सैन्याला मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी जंगलात पुन्हा मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी उडालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले. त्यात दहशतवाद्यांनी पलायन केले होते. दुसऱ्यांदा दहशतवाद्यांना मनीगाह जंगलात घेरण्यात आले. दोन दिवसांच्या मोहिमेत कर्नल शहीद झाले. तीन अन्य जवान जखमी आणि अन्य तीन जखमी झाले. त्यावेळी अतिरेक्यांनी पुन्हा पलायन केले. या शुक्रवारी पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली. परंतु दहशतवादी हाती लागले नाहीत.
सीआरपीएफ पथकावर ग्रेनेड हल्ला, तीन जवानासह २ नागरिक जखमी
काश्मीरच्या पंपोर भागात शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ११० बटालियनवर सापळा रचून ग्रेनेडने हल्ला केला. हे पथक बाजारपेठेत गस्तीवर असताना हा हल्ला करण्यात आला. त्यात तीन जवान आणि दोन नागरिक जखमी झाले. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात शोध माेहिम हाती घेण्यात आली. परंतु हाती काही लागले नाही. बांडीपोर या अन्य एका घटनेत झेलम नदीतून वाळू नेताना एका तरुणाच्या हाती काहीतरी लागले. तो त्याच्याशी झटत असतानाच स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून त्याचे सहकारी आले. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटात त्याला हात गमवावा लागला.

दक्षिण श्रीनगरच्या पामोर येथे शुक्रवारी स्फोट झाला होता. त्यानंतर जवान परिसरात गस्त घालताना.