आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मिक स्थळे अतिरेक्यांच्या टार्गेटवर; बिहारचे महासंचालक अभयानंद यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- देशातील अनेक धार्मिक स्थळे अतिरेक्यांच्या निशाण्यावर आहेत. रांचीतील धाडसत्रात सापडलेल्या कागदपत्रांतून याची माहिती मिळाली आहे. बुद्धगया मंदिर व गांधी मैदावरील स्फोटांचे गूढ उलकलल्याचा दावा करत बिहारचे पोलिस महासंचालक अभयानंद यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

अभयानंद म्हणाले की, दोन्ही घटनांत इंडियन मुजाहिदीनचाच हात आहे. सुरक्षेच्या कारणावरून कट रचणार्‍यांची नावे उघड केली नाहीत. पाटणा स्फोट प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिसांनी रांचीत टाकलेल्या धाडीत अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे हाती लागली आहेत. मुजिबुल अन्सारीच्या घरावरील धाडीत गांधी मैदानाचा आराखडा मिळाला. कुठे-कुठे,केव्हा-केव्हा स्फोट करायचे आहेत, याचे सविस्तर निर्देश त्यात आहेत. धाडीत देशातील इतर धर्मस्थळांचेही नकाशे सापडले आहेत. ही स्थाने अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याचे समजले जात आहे. धाडीत मोठय़ा प्रमाणावर स्फोटके आढळली होती.

भुसावळ, मनमाडला धोका
भुसावळ- मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वेस्थानकासह विभागात अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याची सूचना मिळताच हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा बलाने खबरदारीचे उपाय म्हणून नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, खंडवा, बर्‍हाणपूर, मलकापूर, अकोला, बडनेरा, शेगाव या रेल्वेस्थानकांवर बंदोबस्तात वाढ केली आहे. अप्रिय घटना टाळण्यासाठी श्वान पथकाकडून तपासणी सुरू आहे.