आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लष्कर’च्या दहशतवाद्याला बारामुल्ला जिल्ह्यातून अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- येथील पाेलिसांनी नाका तपासणीदरम्यान लष्कर-ए-ताेयबाशी संबंध असलेल्या उत्तर काश्मीर गटाच्या एका दहशतवाद्याला बारामुल्ला जिल्ह्यातून नुकतीच अटक केली. ताे नाक्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत हाेता. सदर परिसर पाेलिस व सुरक्षा दलांकडून प्रतिबंधित करण्यात अालेला अाहे. 

इश्फाक अहमद कन्ना असे त्याचे नाव असून, ताे जमैया कदिम साेपारचा रहिवासी असल्याचे पाेलिसांनी सांगितले. कन्ना हा नुकताच लष्कर-ए-ताेयबात सामील झाला असून, त्याच्याकडून पाेलिसांनी एक पिस्तूल, मॅगझिन, ५ काडतुसे व २ ग्रेनेड जप्त केले. त्याचा उत्तर काश्मीर गटाशी संबंध आहे. 
बातम्या आणखी आहेत...