आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगरमध्ये जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला; पाकिस्तानच्या गोळीबारात जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंथा चौकात याच बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. - Divya Marathi
पंथा चौकात याच बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.
श्रीनगर- पंथा चौक या ठिकाणी दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर हल्ला केला आहे. या घटनेत 5 पोलिस जखमी झाले आहेत. पुंछ सेक्टरमध्येही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सीमेपलिकडून करण्यात आलेल्या गोळीबारात BSF चा एक सब-इन्सपेक्टर शहीद झाला आहे. मागील महिन्यातच दहशतवाद्यांनी पुलवामा येथे पोलिसांच्या इमारतीवर हल्ला केला होता. या घटनेत 8 जवान शहीद झाले होते.
 
'जैश'ने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी
- 26 ऑगस्ट रोजी दहशतवाद्यांनी पुलवामा येथे पोलिसांच्या इमारतीवर हल्ला केला होता. या घटनेत 8 जवान शहीद झाले होते.  
- जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. एका व्यक्तीने फोन करुन स्थानिक प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. त्याने आपण जैशचे प्रवक्ते असल्याचे सांगितले. त्याने असे अनेक हल्ले करण्याची धमकीही दिली.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...