आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये पोलिसांवर हल्ला, कारवाईमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये सोमवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या एका तुकडीवर हल्ला केला. दोन्ही बाजुने फायरिंग झाली. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 4 नोव्हेंबरलाही पुलवामाच्या राजपोरा पोलिस ठाण्याच्या जवळ पोलिसांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये एक कॉन्सटेबलही शहीद झाला होता. पोलिसांच्या मते, एका नाका पार्टीवर दहशतवाद्यांनी फायरींग सुरू केले होते. 

शोपियाँमध्ये पोलिसांच्या कॅम्पवर ग्रेनेड फेकले 
- गेल्या शनिवारीच दहशतवाद्यांनी शोपियाँमध्ये पोलिसांच्या कॅम्पवर ग्रेनेड फेकले होते. पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या इमाम साहीब एरियातील कॅम्पवर ग्रेनेड पेकण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले की, हे ग्रेनेड कॅम्पसच्या भिंतीवर पडून तेथे ब्लास्ट झाला, पण त्यामुळे हानी झाली नाही. 

3 वर्षांत 183 जवान शहीद
नोयडाचे आरटीआय अॅक्टीव्हीस्ट रंजन तोमर यांच्या एका अर्जावर गृह मंत्रालयाने नुकतेच उत्तर दिले होते. त्यात गेल्या तीन वर्षांत काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांत 183 जवान शहीद झाले होते, अशी माहिती मिळाली आहे. त्याशिवाय 62 नागरिकही मारले गेले. हा आकडा आंकडा मे 2014 पासून मे 2017 पर्यंतचा आहे.

काश्मीरमध्ये 275 दहशतवादी अॅक्टीव्ह
न्यूज एजन्सीने काही दिवसांपूर्वी सुत्रांच्या हवाल्याने म्हटले होते की, काश्मिरमध्ये सुमारे 275 दहशतवादी अॅक्टीव्ह आहेत. त्यापैकी 250 फक्त पीर पंजाल रेंजमध्ये आहेत. 2017 मध्ये आतापर्यंत 291 दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी 80 यशस्वीही झाले.
बातम्या आणखी आहेत...