आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्‍नान; 1 जवान शहीद, 4 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवानांच्‍या मदतीसाठी जाताना सैन्‍य दल. - Divya Marathi
जवानांच्‍या मदतीसाठी जाताना सैन्‍य दल.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील तंगधारमधील लष्कराच्या गोरखा रायफल कॅम्पवर दहशतवाद्यांनी बुधवारी हल्ला केला आहे. हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. दरम्‍यान, भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्‍नान घातले. 7 ते 8 दहशतवाद्यांनी हा हल्‍ला केली असून, त्‍यांनी अंदाधूंद गोळीबार केला.

तंगधार हा भाग लाइन ऑफ कंट्रोलला (एलओसी) लागून आहे. आत्मघातकी हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हल्ल्यानंतर कॅम्पमध्ये आग लागली आहे.

दुसरीकडे, लष्कराच्या जवानांनी बुधवारी सकाळी पूंछमध्ये सर्च ऑपरेशन राबवले. यात मोठ्या प्रमाणात स्फोटके व पाकिस्तानी करेंसी जप्त करण्‍यात आली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी ऑपरेशन एन्काउंटर सुरू केले आहे.
अपडेट्स
> हल्‍ल्‍याला प्रत्‍युत्‍तर दिल्‍यानंतर काही दहशतवादी फरार होण्‍यास यशस्‍वी झाले. त्‍यांची शोध मोहीम सुरू आहे.
> गोळी लागल्‍याने एक जवान शहीद. कर्नल दर्जाचा एक अधिकारी (204 ब्रिगेडचे डिप्टी कमांडर) जखमी.
> हल्‍ला झाला त्‍यावेळी कॅम्‍पमध्‍ये 70 जवान होते.
> हल्‍ल्‍यानंतर सैन्‍याने परिसरातील गावांना खाली केले. पॅरा कंमाडोजला मदतीसाठी बोलवण्‍यात आले.
> हल्‍ल्‍यानंतर आर्मी कॅम्‍पच्‍या ऑईल साठ्याला आग लागली.
> दहशतवाद्यांनी सलग अर्धा तास फायरिंग करून ग्रेनेड फेकले. यानंतर फायरिंग थांबली.