आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रुरकर्मा कसाबनंतर पहिल्यांदा हाती आला जिवंत पाकिस्तानी दहशतवादी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- जम्मूतील राष्ट्रीय महामार्गावरील दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून नऊ जखमी झाले आहे. लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या (बीएसएफ) ताफ्यावर हल्ला चढवला. बीएसएफच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. तीनपैकी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडले आहे.

मुंबईतील 26/11 हल्ल्यात एकमेव जिवंत पकडलेला क्रुरकर्मा अजमल आमिर कसाबनंतर पहिल्यांदा एखाद्या दशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले आहे. उस्‍मान असे दहशतवाद्याचे नाव आहे. तो पाकिस्तानातील आहे. उस्‍मानकडून AK47 आणि बॅग जप्त करण्‍यात आली आहे. विशेष म्हणजे उस्‍मान याने काही ओलिसांना वेठीस ठेवले होते. ओलिसांनीच उस्‍मान याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
बीएसएफचे जवान राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी गस्त घालत असताना उधमपूरपासून 10 किलोमीटर अंतरावर नरसू भागात लष्कराच्या गणवेशात आलेल्या तीन दहशतवाद्यांनी जवानांच्या बसला टार्गेट केले. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून नऊ जण जखमी झाले आहे. एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दहशवादीसोबत झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, तिसर्‍या दहशतवाद्याने पाच जणांना वेठीस ठेवले. ओलिसांनी मोठी हिम्मत दाखवून त्याच्याकडील शस्त्र हिसकावून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

डीआयजी सुरेंद्र गुप्ता यांनी दिलेली माहिती अशी की, ऑपरेशन यशस्वी झाले आहे. तीन पैकी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आले असून एकाला जिवंत पकडण्यात आले आहेत. त्याचे नाव कासिम खान आहे. दहशतवाद्यांनी पहिल्यांदा राष्ट्रीय महामार्गावर हल्ला केला आहे. याआधी महामार्गावर कोणताही दहशतवादी हल्ला झाला नव्हता.

अमरनाथ यात्रेकरू निशाण्यावर...
अमरनाथ यात्रेला जाणारे भाविक दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बीएसएफच्या बस मागे अमरनाथ यात्रेकरूंचा जत्था येणार होता. दहशतवाद्यांना त्यांच्यावर हल्ला करायचा होता. मात्र, हल्ल्याची माहिती मिळतात अमरनाथ यात्रेकरुंना पोलिसांना भगवती नगरात थांबवण्यात आले होते. जम्मू-श्रीनगर महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात आला आहे.

तिन्ही दहशतवादी एका ट्रकमधून काश्मीरमधून आले होते. सगळ्यात आधी दहशतवाद्यांना पाहाणार्‍या व्हीडीसी सदस्यांनी ही माहिती दिली आहे. समरोली भागात ते ट्रकमधून खाली उतरले आणि झुडपांमध्ये लपून बसले होते. बीएसएफची बस येताच त्यांनी अंदाधूंद गोळीबार केला.

ओमर यांचे 'ट्वीट'
जम्मू-काश्मीरचा माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी 'ट्वीट' करून बीएसएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली आहे. ओमर यांनी चिंता व्यक्त केली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सोशल मीडियात शेअर झालेले फोटो...
बातम्या आणखी आहेत...