आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRPFच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला, 8 शहीद; उच्चायुक्त म्हणाले, इफ्तार पार्टी एन्जाॅय करू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संध्याकाळी ५.५० वाजता हल्ला झाला. माहिती मिळताच लष्कर घटनास्थळी दाखल झाले व जखमींेवर प्रथमोपचार केले. - Divya Marathi
संध्याकाळी ५.५० वाजता हल्ला झाला. माहिती मिळताच लष्कर घटनास्थळी दाखल झाले व जखमींेवर प्रथमोपचार केले.
श्रीनगर - सुमारे तीन वर्षांनंतर काश्मीरमध्ये मोठा अितरेकी हल्ला झाला. पंपोरमध्ये फायरिंग रेंजहून सराव करून परतणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या बसवर अितरेक्यांनी हल्ला केला. यात दोन सब इन्स्पेक्टरसह ८ जवान शहीद झाले. २० हून अधिक जखमी झाले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी ही राजकीय घटना असल्याचे सांगून अक्कल पाजळली. दिल्लीत एका इफ्तार पार्टीत त्यांना या हल्ल्याबाबत विचारले तेव्हा हसत निलाजरेपणाने ते म्हणाले - ‘राजकीय गप्पा तर होत राहतील. आज इफ्तार पार्टी आहे... लेट्स एन्जॉय अवरसेल्फ.’

दरम्यान, सीआरपीएफच्या आयजींनी सुरक्षा व्यवस्थेची ही चूक असल्याचा आरोप फेटाळला. आयजी नलिन प्रभात म्हणाले की, सुरक्षा व्यवस्थेत चूक असती तर अतिरेकी हल्ला करून पाकिस्तानात पळाले असते. आम्ही त्यांना जागीच ठार मारले. पंपोरमध्ये झालेला तीन वर्षांतील हा सर्वांत मोठा हल्ला आहे. यापूर्वी २४ जून २०१३ रोजी हैदरपोरामध्ये ९ जवान शहीद झाले होते. शहीद झालेल्या जवानांत ५ उत्तर प्रदेशचे तर बिहार, पंजाब, केरळचा प्रत्येकी एक जवान आहे.

४० किमी दूर सरकारी जलसा :
घटनास्थळापासून ४० किलोमीटर अंतरावर अनंतनागमध्ये सत्तारूढ पक्ष आनंदोत्सव साजरा करत होता. शनिवारी पोटनिवडणुकीचा निकाल लागला. यात मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती विजयी झाल्या.

अात्मघाती हल्ल्याचा प्लॅन
सीआरपीएफचे अधिकारी भावेश चौधरी म्हणाले, जवान तीन बसेसमध्ये होते. संध्याकाळी ५.५० वाजता ताफा पंपोरच्या बाजारात पाेहोचला. कारमधून आलेल्या अतिरेक्यांनी दुसऱ्या क्रमांकाच्या बसच्या चालकाला गोळी मारली. मागील सर्व बसेस थांबल्या. अतिरेकी बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, रोड आेपनिंग पार्टीचे जवान आले. त्यांनी अतिरेक्यांना टिपले.

२ जुलैला याच मार्गाहून अमरनाथ यात्रेकरूंचा दीड महिना प्रवास...
अतिरेक्यांना कव्हर देण्यात महिला पुढे
हल्ल्याच्या वेळेस स्थानिक लोक अतिरेक्यांना वाचवतात. जवानांवर दगडफेक करतात. यात महिला पुढे असतात. दरम्यान अतिरेकी पळतात.

- ३ जून : बिजबिहेडा, बीएसएफ ताफ्यावर हल्ला. ३ शहीद
- १३ जूनला सीआरपीएफ जवानावर हल्ला. एका महिलेचा मृत्यू.
- २० फेब्रुवारीला सीआरपीएफवर हल्ला. ४८ तास चकमक. तीन शहीद.
पुढेे पाहा, संबंधित फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...