आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K मध्ये लष्कराच्या पेट्रोलिंग टीमवर दहशतवादी हल्ला; 3 जवान शहीद, 4 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील शोपियांमध्ये गुरुवारी सकाळी दहशतवादी हल्ला झाला. लष्कराच्या पेट्रोलिंग टीमवर हल्ला करण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, 3 जवान शहीद झाले असून 4 जखमी झाले आहेत. लष्कराच्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूने झालेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली.
 
सुरक्षा यंत्रणेने संपूर्ण परिसराला टाकला वेढा 
- जखमी जवानांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
- अशी माहिती आहे की दहशतवाद्यांनी शोपियां जिल्ह्यातील आर्मीच्या सूमो गाडीवर हल्ला केला. प्रत्युत्तरात जवानांनी फायरिंग केले.
- दोन्ही बाजूने झालेल्या फायरिंगमध्ये एका महिलेला गोळ्या लागल्या. महिला घरातच होती. तिचा मृत्यू झाला आहे. 
- दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसराला वेढा टाकला आहे.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...