आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Terrorists Attacked A Police Party At A Bus Stand In J&K Anantnag, One Jawan Martyred

राजनाथ यांच्या बैठकीपुर्वी काश्मीरमध्ये 2 दहशतवादी हल्ले, जवान शहीद, दहशतवाद्यास कंठस्नान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवादी हल्ल्यात 1 जवान शहीद झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. - Divya Marathi
दहशतवादी हल्ल्यात 1 जवान शहीद झाला असून 2 जण जखमी झाले आहेत.
श्रीनगर- केंद्रीयगृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या आदल्या दिवशी शनिवारी सायंकाळी अनंतनागमध्ये पोलिस पथकावर अतिरेकी हल्ला झाला. यामध्ये एक पोलिस शहीद तर दोघे जखमी झाले. सूत्रांनुसार, अतिरेक्यांनी सायंकाळी बस स्टँडनजीक पोलिसांवर गोळीबार केला, त्यात तीन पोलिस जखमी झाले. यानंतर कॉन्स्टेबल इम्तियाज अहमद यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर उद््भवलेल्या गोंधळाचा फायदा घेत हल्लेखोरांनी पळ काढला. गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण काश्मीरमध्ये हाय अलर्ट आहे. 
 
सुरक्षा दलांनी केला दहशतवाद्याचा खात्मा 
बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे सध्या 4 दिवसांच्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे रविवारी त्यांची बैठक ज्या ठिकाणी होणार आहे. बैठकीच्या ठिकाणापासून 500 यार्डाच्या अंतरावर हा हल्ला करण्यात आला आहे. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...