आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरमध्ये BSF च्या ताफ्यावर गोळीबार, एक जवान जखमी; 36 तासांत दुसरा हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरमधील लांगेट येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर हल्ला केला. यात बीएसएफ हेडकॉन्स्टेबल सतिंदर सिंग जखमी झाले. बीएसएफचा ताफा वादी पोरा भागात जात असताना हा हल्ला करण्यात आला.
36 तासांत दुसरा हल्ला
- न्यूज एजंसीच्या वृत्तानुसार, बीएसएफचा ताफा उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथून जात होता.
- ताफा वादी पोरा भागात पोहोचल्यानंतर दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला.
- बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून प्रकृती स्थीर आहे.
- अधिकारी म्हणाले, हंदवाडाच्या सुरक्षा रक्षकांवर 36 तासांत दुसरा हल्ला झाला आहे.
- गुरुवारी रात्री हंदवाडा येथील एका पोलिस स्टेशनला लक्ष्य करण्यात आले होते.
- प्रत्युत्तरात केलेल्या फायरिंगनंतर दहशतवाद्यांनी पळ काढला होता.
बातम्या आणखी आहेत...