आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाणकोटजवळ अतिरेकी लपले, नव्या हल्ल्याचा धोका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या पठाणकोट हवाई दल तळाजवळच्या गावांमध्ये अतिरेकी लपून बसले असून ते या हवाई दल तळावर केव्हाही नव्याने हल्ला करू शकतात, असा इशारा गृह खात्याच्या संसदीय स्थायी समितीने दिला आहे.

या धोक्याबाबत सरकारला सूचना देण्यात आली असून रणनीतीच्या दृष्टीने या महत्त्वाच्या हवाई दल तळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असे समितीने म्हटले आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या सुरक्षा बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी ही समिती सध्या जम्मूत आहे. तत्पूर्वी या समितीने पठाणकोटचा दौरा केला.समितीचे अध्यक्ष पी. भट्टाचार्य यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

सांगितले की, पठाणकोटहून परतल्यानंतर आम्ही सरकारसमोर आमच्या सूचना मांडल्या. काही अतिरेकी अद्यापही पठाणकोट हवाईदल तळाशेजारच्या गावांत लपून बसले असल्याचे आम्हाला गावकऱ्यांनी सांगितले आहे. समितीच्या शिफारशीनंतर सरकारने सीआरपीएफ, बीएसएफ आणि लष्कराला सतर्कतेचे आदेश दिले आणि हवाईदल तळाच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

काही अतिरेकी लपून बसलेले असल्यामुळे काही दिवसांपूर्वी सरकारने सीआरपीएफ, बीएसएफ आणि लष्कराकडे हवाईदल तळाची सुरक्षा सोपवली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? हे अतिरेकी तेथे कसे काय लपून बसले हे शोधण्याचे माझे काम नाही. मात्र गावकऱ्यांनी आम्हाला माहिती मिळताच अतिरेकी कुठेतरी लपून बसले आहेत, याबाबत आमच्या मनात शंका राहिलेली नाही. याबाबत आम्ही सरकारला माहिती दिली आहे, असे भट्टाचार्य म्हणाले.

२ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी तपास पथकाला पठाणकोट हवाईदल तळावर जाण्याची परवानगी दिली, त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता भट्टाचार्य म्हणाले की, पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या तळाचा दौरा करण्याची परवानगी देण्याच्या बाजूने आम्ही नव्हतो.

पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने केलेल्या उपाययोजनांची समितीने स्तुती केली आणि त्यांना अत्याधुनिक उपकरणे देण्याची शिफारसही केली. भट्टाचार्य म्हणाले की, घुसखोरी रोखण्याचा आम्ही कसा तरी प्रयत्न करत आहोत. आजपर्यंत सर्व काही सुरळीत आहे, पण आज किंवा उद्या काय होईल, हे सांगता येत नसल्याचे बीएसएफने आम्हाला सांगितले आहे.

पाकला पठाणकोटला का बोलावले?
पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना बोलावण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे आम्ही समर्थन करत नाही. कशासाठी त्यांना परवानगी दिली? मात्र भारत सरकारच्या परदेश धोरणासाठी आम्ही योग्य मंच नाही. परवानगी द्यायची की नाही, याबाबत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, असे संसदीय स्थायी समितीचे प्रमुख पी. भट्टाचार्य म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...