आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन दिवाळीत सांगलीवर शोककळा, दहशतवाद्यांशी चकमकीत हेड कॉन्सटेबल नितीन कोळी शहीद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू/नवी दिल्ली - पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी एलओसीवर हल्ला चढवला. मच्छिल सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकित आर्मीचे दोन जवान शहीद झाले. यापैकी एक जवान हेड कॉन्सटेबल नितीन सुभाष कोळी असल्याची माहिती समोर आलेली आहे. नितीन सुभाष हे सांगली जिल्ह्यातील आहेत.
आणखी एक जवानही शहीद झाल्याचे वृत्त आहे. मात्र दहशतवाद्यांनी पळून जाण्यापूर्वी या शहीद जवानाच्या पार्थिवाची विटंबना केली. जवानाचे शीरही कापले. पाक आर्मीकडून दहशतवाद्यांना कव्हर फायरिंग दिले जात होते. लष्कराने जवानाचे शीर कापल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. पण विटंबनेचा बदला घेणार असल्याचे म्हटले आहे. एक दहशतवादीही चकमकीत मारला गेला.

पंतप्रधान गृहमंत्र्यांना दिली माहिती..
- रात्री साडेअकरा वाजता डीजीएमओने पंतप्रधान, डिफेन्स मिनिस्टर आणि एनएसएला या घटनेची माहिती दिली. पाकचे उच्चायुक्त बासित यांना शनिवारी बोलावण्यात आले आहे.
- सर्जिकल स्ट्राइकनंतर बरोबर महिनाभराने पाकने हा हल्ला केला आहे. या महिन्यात 4 जवान शहीद झाले आहेत.
- दरम्यान शुक्रवारी पाकिस्तानकडून कठुआ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. बीएसएफकडूनही प्रत्युत्तरात किरकोळ गोळीबार करण्यात आला.
- डिफेन्स एक्सपर्ट पीके सहगल म्हणाले, पाकने कारगिल युद्धावेळी जे केले होते, तेच आताही करत आहे. दुर्दैवाने तेव्हा आपल्याला हा मुद्दा यूएनमध्ये उचलता आला नव्हता. मात्र आता भारताने हा मुद्दा यूएनमध्ये उचलायला हवा.

सीमेवरील गावे रिकामी केली
- पाकिस्तानकडून एलओसी आणि इंटरनॅशनल बॉर्डरवर शुक्रवारी दिवसभर फायरिंग सुरू होती. चौक्यांबरोबर सीमेवरील गावांनाही लक्ष्य करण्यात आले.
- बॉर्डरवर 30 आणि एलओसीवर 10 हून अधिक चौक्यांवर फायरिंग करण्यात आली. यात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला.
- आर्मीच्या 21 पंजाब रेजिमेंटचे मेजर अजित सिंह आणि बीएसएफ जवान बी व्यंकटेशसह 10 जण जखमी झाले आहेत. सीमेवरील बहुतांश गावे रिकामी करण्यात आली आहे.
- पंजाबमधील सीमेवरील गावे धलोतर, पलाह, ढींडा, कोटली येथेही पाकने फायरिंग केले.
- लष्करा पाकच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे.

हल्ल्यामागचे कारण काय..?
- पाक आर्मीचे कमांडो एलओसीवर कुंपनापर्यंत पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.
- 29 नोव्हेंबरला निवृत्त होण्यापूर्वी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना काहीतरी मोठी कारवाई करायची आहे.
- पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राइकचा बदला घ्यायचा आहे. दिवाळीच्या काळात पाकने नेहमीच असे प्रकार केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रिकाम्या करण्यात येणाऱ्या गावांची सद्यस्थिती...
बातम्या आणखी आहेत...