आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, CRPF ऑफिसर शहीद; 6 जवान जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नौहट्टा चौकात दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफला लक्ष्य केले. - Divya Marathi
नौहट्टा चौकात दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफला लक्ष्य केले.
श्रीनगर - येथील नौहट्टा चौकात दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफला लक्ष्य केले. या चकमकीत सीआरपीएफचे कमांडिंग ऑफिसर शहीद झाले तर 6 जवान जखमी आहेत. सीआरपीएफ छावणीजवळ दडून बसलेल्या दोन दहशतवाद्यांनी सोमवारी अंदाधूंद फायरिंग केली. येथे सर्च ऑपरेशन सुरु आहे. दुसरीकडे, काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले.

महेबुबा म्हणाल्या - काश्मीरच्या परिस्थितीसाठी केंद्र जबाबदार
- श्रीनगरमध्ये मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी स्वातंत्र्यदिनानिमीत्त केलेल्या भाषणात केंद्र सरकारवर निशाणा साधला.
- त्या म्हणाल्या जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीला केंद्र जबाबदार आहे.
- दहशतवादी बुऱ्हानच्या एन्काऊंटरचा उल्लेख करुन त्या म्हणाल्या, याआधीही एन्काऊंटर होत आले आहेत, मात्र याच्यात आमची काय चूक झाली ते कळत नाही.
बातम्या आणखी आहेत...