आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : दहशतवाद्यांच्‍या तावडीतून सुटलेल्‍या एसपींनी म्‍हटले - जिवंत आहे, हा गुन्‍हा का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट - हवाई दलाच्‍या तळावर हल्‍ला करण्‍यापूर्वी दहशतवाद्यांनी पोलिस अधीक्षक सलविंदरसिंग यांचे अपहरण केले होते. त्‍यानंतर अवघ्‍या 24 तासांत हल्‍ला झाला. या अपहरणातून एसपी यांनी आपली कशी सुटका करून घेतली याची माहिती त्‍यांनी प्रसार माध्‍यमांना दिली.
प्रश्‍न - तुम्‍ही दहशतवाद्यांची माहिती दिल्‍यानंतरही हा हल्‍ला थांबवता आला नाही तो का ?
एसपी सलविंदरसिंग - मला या बाबत काही माहिती नाही.
प्रश्‍न - तुमच्‍यासोबत त्‍या दिवशी काय आणि कसे झाले ?
एसपी सलविंदरसिंग - नवीन वर्ष असल्‍याने मी धार्मिळ स्‍थळावर दर्शनासाठी गेलो होतो. परतीच्‍या प्रवासात आम्‍ही तारागडचा शॉर्टकट रस्‍ता निवडला. या रस्‍त्‍याने आम्‍ही पहिल्‍यांदाच जात होतो. माझा मित्र राजेश वर्मा गाडी चालवत होता. अचानक काही लोकांनी आमच्‍यावर हल्‍ला करत म्‍हटले, ''गाडीचे लाइट बंद करा !'' ही घटना गुरुवारी रात्री 11.30 ते 12 वाजताच्‍या सुमारास घडली.

- नंतर त्‍यांनी मला पाठीमागून धक्‍का दिला. माझे हात आणि डोळ्यांवर पट्टी बांधली.

- जवळपास 45 मिनिटांपर्यंत त्‍यांनी आम्‍हाला गाडीतूनच फि‍रवले. शुक्रवारी सकाळी मी स्‍वत: डोळ्यांवरील पट्टी काढली.

- ते चार ते पाच लोक होते. त्‍यांच्‍या जवळ एके-47 होती. त्‍यांनी माझ्या गळ्यावर बंदूक लावून म्‍हटले मी ठार मारू.
प्रश्‍न - तुम्‍ही कसे सुखरुप सुटले ?
एसपी सलविंदरसिंग - मी जिवंत सुटलो ही माझी चूक आहे का ? जर मी काही चूक केले असेल तर मला फासावर लटका. मी कुणालाच घाबरत नाही.
प्रश्‍न - दहशतवादी कोणत्‍या भाषेत बोलत होते ?
एसपी सलविंदरसिंग - ते उर्दू, पंजाबीतून बोलत होते. मी जर काही बोललो तर मला मारण्‍याची धमकी त्‍यांनी दिली होती.

- माझ्याकडे काहीही शस्‍त्र नव्‍हते. त्‍यांनी जॅकेटने मला बांधले होते. जेव्‍हा माझ्या गनमॅनने माझ्या फोनवर कॉल केला तेव्‍हा त्‍यांना कळाले की, मी पोलिस अधिकारी आहे.
- तोपर्यंत त्‍यांना माहिती नव्‍हते की पोलिस अधिकारी आहे म्‍हणून. त्‍यामुळे त्‍यांनी मला सोडून दिले. मात्र, त्‍यांना माहिती पडताच ते मला मारण्‍यासाठी परत आले.

- त्‍याच कॉलनंतर ते अलर्ट झाले.

पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित व्‍ह‍िडिओ आणि वाचा पोलिसांनी म्‍हटले - एसपीचे रेकॉर्ड ठीक नाही...
बातम्या आणखी आहेत...