आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorists Trying To Take Revenge Of Dadri And Mainpuri Incidents

दादरीचा बदला घेण्याच्या प्रयत्नात दहशतवादी, महिला पोलिस जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : युपीच्या दादरीमध्ये बीफ खाल्ल्याची अफवा पसरल्यानंतर अखलाक नावाच्या व्यक्तीची मारून मारून हत्या करण्यात आली होती. त्याच्या मृत्यूमुळे शोक व्यक्त करणारे अखलाकचे कुटुंबीय. - Divya Marathi
फाइल फोटो : युपीच्या दादरीमध्ये बीफ खाल्ल्याची अफवा पसरल्यानंतर अखलाक नावाच्या व्यक्तीची मारून मारून हत्या करण्यात आली होती. त्याच्या मृत्यूमुळे शोक व्यक्त करणारे अखलाकचे कुटुंबीय.
नोयडा - युपी पोलिसांची गुप्तचर यंत्रणा आणि इंटलिजन्स ब्युरो (आईबी) ला मिळालेल्या एका रेकॉर्डींग (इंटरसेप्ट) द्वारे एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. दहशतवादी दादरी आणि मैनपुरीमध्ये जालेल्या घटनांचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे यावरून समोर आले आहे. त्यासाठी दहशतवादी स्लिपर सेल अॅक्टीव्हेट करून अनेक शहरांमध्ये ब्लास्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. इंटरसेप्टनुसार दहशतवादी संघटनांशी संबंधित काही जण महिला पोलिस अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांचा या कटासाठी वापर करण्याची शक्यता आहे.

दादरी आणि मैनपुरीतील घटना...
>28 सप्टेंबरला युपीच्या दादरीमध्ये बीफ खाल्ल्याची अफवा पसरल्यानंतर मोहम्मद अखलाक नावाच्या व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आली होती.
>10 ऑक्टोबरला मैनपुरी जिल्ह्यात गायीचे कातडे काढल्याच्या मुद्यावरून गर्दीने दोन तरुणांना मारहाण केली होती. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. त्यांना वाचवायला आलेल्या पोलिसांवरही गर्दीने जीवघेणा हल्ला केला.

इंटरसेप्टमध्ये काय...
>पाच पानांच्या इंटरसेप्टमध्ये दहशतवादी ज्यांना लक्ष्य करत आहेत त्यांची नावे आहेत. यात विहिंपचे अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया यांचा समावेश आहे.
>इंटरसेप्टमध्ये दोन जण राज्यातील स्लीपर सेलबाबत बोलत असल्याचे समोर आले आहे. ते अनेकवेळा अलाहाबादच्या एका व्यक्तीचा उल्लेख करतात. हा व्यक्ती दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्यांना मदत करण्यासाठी ओळखला जातो.
>चर्चेदरम्यान एक व्यक्ती दुसऱ्याला सांगतो की, त्याच्या जाळ्यात अडकलेल्या काही महिला पोलिसही या कटात त्यांची मदत करणार आहे.
>राज्यात अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशी विश्वनाथ मंदिर आणि अयोध्येच्या रामलला मंदिराला लक्ष्य करण्याचेही बोलले गेले आहे.

दोन जण ताब्यात
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंटलिजन्स एजंसी आणि मिलिट्रीने अलाहाबादमध्ये दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी चौकशीच युपी विधानसभा, अलाहाबाद हायकोर्ट, कानपूर रेल्वे स्टेशन आणि अलाहाबादमध्ये माजी सैनिकांच्या कॉलनीना लक्ष्य करण्याच्या कटाचा खुलासा केला आहे.

पोलिसांचे म्हणणे काय...
हे इंटरसेप्ट पोलिसांच्या हाती लागल्यानंतर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. इंटरसेप्ट राज्याचे डीआयजी, आयजी, एसएसपीसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. जीआरपीचे वरिष्ठ अधिक्षक गोपेशनाथ खन्ना यांनी सांगितले की, पंजाबच्या गुरदासपूरमध्ये झालेल्या हल्ल्यात जास्त हानी झाल्याने दहशतदी संघटना संतप्त आहेत. त्यामुळे ते दादरीमध्ये झालेल्या घटनेचा गैरफायदा घेण्यासाठी उत्सवांच्या काळात अशांती पसरवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आम्ही हाय अलर्टवर आहोत. आगरा येथील आयजी डीजी मिश्रा यांनी मात्र केवळ उत्सवांच्या पार्श्वभूमिवर अलर्ट जारी केल्याचे म्हटले आहे.