आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorists Upload Photos On Facebook As Amarnath Yatra Gets Underway

अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचे सावट, फेसबुकवर फोटोनंतर यंत्रणा अलर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवाद्यांनी फेसबुकव अपलोड केलेले छायाचित्र - Divya Marathi
दहशतवाद्यांनी फेसबुकव अपलोड केलेले छायाचित्र
श्रीनगर - अमरनाथ यात्रेवरील दहशतवादाच्या सावटादरम्यान 11 दहशतवाद्यांचा फोटो फेसबुकवर अपलोड करण्यात आल्यानतंर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. फोटोमध्ये दहशतवाद्यी मिलिटरी युनिफॉर्ममध्ये हातात शस्त्र घेऊन दिसत होते. सूत्रांच्या माहितीनूसार, या दहशतवाद्यांनी नुकतेच हिजबुल मुजाहिदीन संघटना जॉइन केली आहे. दोन दिवसांपूर्वी हे फोटो फेसबुकवर अपलोड करण्यात आले होते, मात्र आता ते काढून घेण्यात आले आहेत. ते कोणी काढले याची माहिती मिळू शकलेली नाही. बुधवारी अमरनाथ यात्रा सुरु झाली असून पाच हजार भक्तांचा पहिला जत्था रवाना झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन.एन.व्होरा यांनी दर्शन केले आहे.
दहशतवाद्यांमध्ये एक माजी कॉन्स्टेबल
दहशतवाद्यांनी शोपिंया किंवा पुलवामा येथे हा फोटो घेतला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे दोन्ही जिल्हे दहशतवादी संघटनांना नवी भरती करण्यासाठी पुरक मानले जात आहेत. फोटोमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसचा एक कॉन्स्टेबल दिसत आहे. पीडीपी-भाजप युती सरकारमधील मंत्री अलताफ बुखारी यांचा तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्याच्यावर दोन एके 47 रायफल चोरण्याचा आरोप होता. या फोटोमध्ये दिसत असलेला दुसरा दहशतवादी खोऱ्यातील दहशतवादाचा तरुण चेहरा म्हणून ओळख असलेला बुरहान वाणी आहे. त्याचे इतर काही फोटोज् देखील फेसबुकवर अपलोड करण्यात आले होते, ते सुरक्षा यंत्रणांनी डिलीट केले होते. यंत्रणा आता या साइट्स ब्लॉक करण्याचा विचार करत आहेत. पोलिसांना शंका आहे, की या वर्षी 36 युवकांनी दहशतवादाचा मार्ग निवडला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दहशतवाद्यांनी अपलोड केलेला फोटो आणि अमरनाथ धाम