आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorists Who Attacked Punjab Had Lethal Armour Piercing Bullets

दहशतवाद्यांनी आणल्या होत्या बुलेटप्रूफ जॅकेट्स भेदणाऱ्या चीनमेड गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी दिनानगरमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करण्याऱ्या तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर पोलिसांचे पथक. - Divya Marathi
सोमवारी दिनानगरमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करण्याऱ्या तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर पोलिसांचे पथक.
चंदिगड - सोमवारी गुरूदासपूरच्या दिनानगर पोलिस ठाण्यावलर हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी हे शस्त्रास्त्रांनी सज्ज होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने पंजाब पोलिसांच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, दहशतवाद्यांकडून गोळ्या मिळालेल्या गोळ्या या बुलेटप्रूफ जॅकेट भेदण्यासदेखिल सक्षम आहेत. या गोळ्या चीनमध्ये तयार करण्यात आल्या आहेत.

वाहनांसाठीही धोकादायक
दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर मिळालेल्या गोळ्यांना टेक्निकली armour-piercing incendiary bullets किंवा एपीआय म्हटले जाते. अधिकाऱ्यांच्या मते या बुलेट्स बुलेट प्रूफ जॅकेट आणि गाड्यांच्या बॉडीमधूनही आरपार होऊ शकतात. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये फार कमी वेळा या बुलेट्सचा वापर करण्यात आला आहे.

पोलिसांकडे जॅकेट्सचीही कमतरता
पंजाब पोलिसांमध्ये सुमारे 80 हजार अधिकारी आणि जवान आहेत. पण एवढ्या मोठ्या स्टाफसाठी केवळ 1387 बुलेट प्रूफ जॅकेट्स आहेत. तेही एपीआय बुलेट्सपासून बचाव करू शकतील असे नाही. एपीआय बुलेट्सचा आकार 7.62 एमएम असतो. पण त्याचे समोरचे टोक (प्रोजेक्टाइल्स) अत्यंत कडक आणि टोकदार असते, ते 0.7 इंच स्टीलच्याही आरपार जाऊ शकते. बुलेट प्रूफ जैकेट तयार करताना 0.7 इंचाची स्टील फ्रेम वापरली जाते.

चीनमध्ये उत्पादन
तपासावरून लक्षात आले की, गोळ्यांच्या हेडस्टॅम्पवर 71 लिहिलेले आहे. हेडस्टॅम्पवरूनच मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा देशाबाबत माहिती मिळते. 71 नंबर चीनसाठी वापरला जातो. मात्र गुरूदासपूरचे एसपी बलजित सिंह यांचा मृत्यू याच गोळीमुळे झाला अथवा नाही, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. एका पोलिस अधिकाऱ्याला जी गोळी लागली ती मात्र एपीआय बुलेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला तंदुरुस्त व्हायला सहा महिने लागतील असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO