आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Test Fire Indias Indigenous Cruise Missile Nirbhay Fails Midway

128 KM नंतर समुद्रात पडले निर्भय क्षेपणास्‍त्र, पुन्‍हा एक चाचणी अपयशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - जमीनवरून जमीनवर मारा करणारी भारतीय बनावटीच्‍या क्रूज क्षेपणास्‍त्राची चाचणी आज (शुक्रवार) अपयशी ठरली. हे क्षेपणास्‍त्र हवेतच दिशाहीन झाले असून, त्‍यात अनेक तांत्रिक अडचणी आल्‍यात.
लॉन्चिंगनंतर काय झाले?
डीआरडीओच्‍या सूत्रांनुसार, शक्रवारी सकाळी 11.38 वाजता ओडिशाच्‍या बालासोरमधील चांदीपूर इंटिग्रेटेड टेस्ट रेंजपासून निर्भय क्षेपणास्‍त्र लॉन्च केले गेले होते. पण, टेस्ट फायरच्‍या 11 मिनिटानंतर क्षेपणास्‍त्र निर्धारित ठिकाणापासून भटकले. त्‍याला 750 ते 1000 किलोमीटरची रेंज कवर करायची होती. परंतु, 128 128 किलोमीटर अंतर कापल्‍यानंतर ते बंगालच्‍या खाडीत पडले.
यापूर्वीही आले होते अपयश
यापूर्वी 12 मार्च 2013 रोजी या क्षेपणास्‍त्राची चाचणी घेण्‍यात आली होती. पण, अवघ्‍या 20 च मिनिटांमध्‍ये ते समुद्रात पडले. नंतर 17 ऑक्‍टोबर 2014 ला जास्‍त उंचावर गेल्‍याने त्‍याच्‍या चाचणीत तांत्रिक अडचण आली. त्‍यामुळे तिही चाचणी अपयशी ठरली.
सहा मीटर लांब आहे क्षेपणास्‍त्र
- हे क्षपणास्‍त्र सहा मीटर लांब आणि अर्धा मीटर जाड आहे.
- त्‍याचे वजन 1500 से किलो आहे.
- त्‍याचे विंग स्पॅन 2.7 मीटर लांब आहेत.
- एकाच वेळी अनेक टारगेटवर ते पोहोचावे, यासाठी प्रयत्‍न केले जात आहेत.
- त्‍याला सरफेस लॉरी, जहाज, पाणबुटी फाइटर प्लेनवरून डाकले जाऊ शकते.
- त्‍याला डागल्‍यानंतर ते 1 हजार मीटर उंच सरळ जाते.
- नंतर हॉरिजॉन्टल पोजिशनमध्‍ये आपल्‍या टारगेटपर्यंत मॅक्जिमम 750 किलोमीटर/तास गतीने पोहाचते.
- शत्रुचे रडात सहजतेने त्‍याचा शोध घेऊ शकत नाहीत त्‍यामुळे त्‍याला निर्भय असे नाव दिले आहे.