आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सम्यक आंध्र’ मेळावा दणक्यात, तेलंगणा समर्थकांचा धिंगाणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- अखंड आंध्र प्रदेशसाठी शनिवारी सीमांध्र आणि रायलसीमा भागातील राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा भव्य मेळावा शनिवारी हैदराबादे पार पडला. या मेळाव्यादरम्यान तेलंगणा समर्थकांनी हल्ले करून मेळावा हाणून पाडण्याचा प्रयत्न केला परंतु हल्यांना तोंड देत सुमारे एक लाख अखंड आंध्र समर्थकांनी या मेळाव्यास हजेरी लावली.

आंध्र प्रदेशच्या बिगर राजपत्रित अधिकार्‍यांच्या संघटनेने हा भव्य मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यास तेलंगणा भागातील नालगोंडा,खम्मम,मेडक आणि वरंगल जिल्ह्यातील सरकारी कर्मचार्‍यांनीही हजेरी लावली हे विशेष.पण त्यांची संख्या कमी होती. लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर झालेल्या या भव्य मेळाव्यात वैध ओळखपत्र असलेले 80 हजार कर्मचारी सहभागी झाले होते, तर ओळखपत्र नसलेले हजारो कर्मचारी स्टेडियमच्या बाहेर उभे होते.
सम्यक आंध्र मेळावा हाणून पाडण्यासाठी तेलंगणा संयुक्त कृती समितीने 24 तासांचा बंद पुकारला होता.या बंदचा हैदराबाद शहरात फारसा परिणाम दिसून आला नाही. सकाळी आंध्र-रायलसीमा भागातील कर्मचार्‍यांचे जत्थे स्टेडियमकडे जात असताना तेलंगणा समर्थकांनी दगडफेक सुरू केली. स्टेडियमच्या जवळच असलेल्या निझाम महाविद्यालयाच्या वसतिगृहात हे तेलंगणा समर्थक जमले होते.विद्यार्थी असल्याचे भासवून त्यांनी वसतिगृहात प्रवेश केला आणि कर्मचार्‍यांवर दगडफेक सुरू केली. पोलिस त्यांना रोखण्यासाठी हॉस्टेलमध्ये घुसताच पोलिसांवर दगडांचा पाऊसच पडला.यात तीन पोलिस जखमी झाले. अखेर तेलंगणा समर्थकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.