आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखनऊ एन्काउंटर: चकमकीत दहशतवादी जखमी, कमांडो घरात दाखल, ट्रेन ब्लास्टशी कनेक्शन?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- ठाकूरगंज भागात दहशतवादी एका घरात लपून बसला आहे. एटीएसने संशयित दहशतवाद्याला घेरले असून तासाभरापासून गोळीबार सुरु आहे. एटीएसच्या गोळीबारात दहशतवादी जखमी झाला आहे. मंगळवारी सकाळी भोपाळ-उज्जैन पॅसेंजरमध्ये झालेल्या ब्लास्टशी या दहशतवाद्याचे कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे. दुसरीकडे, कानपूर एटीएसने एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.

वाचा अपडेट्‍स...
- मीडिया रिपोर्टनुसार, यूपी एटीएसला ठाकूरगंज भागात एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्‍यात आली आहे.
- ठाकूरगंज भागातील हाजी कॉलनीतील एका घरात दहशतवादी लपून बसला आहे. 20 स्पेशल कमांडोजनी संबंधित घराला घेराव घातला आहे.
- अधूनमधून दहशतवादी आणि कमांडोजमध्ये चकमक होत असल्याची माहिती मिळाली अाहे.
- ऑपरेशनदरम्यान नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे सांगण्यात आले आहे.
- दहशतवाद्याने आत्मसमर्पण करावे, यासाठी कमांडोजचे प्रयत्न सुरु आहे.
- एटीएसने अश्रुधुराचा वापरही केल्याची माहिती मिळाली आहे.
- संशयित आरोपी ISIS शी संबंधित असून त्याचे नाव सैफुल सांगितले जात आहे.
- केरळ एटीएसकडून उत्तर प्रदेश एटीएसला या दहशतवाद्याविषयी माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर ही कारवाई केली जात आहे.
- आत्मसमर्पण करणार नसल्याचे दहशवाद्याने कमांडोंना सांगिल्याची माहिती मिळाला आहे.

काय म्हणाले एडीजी?
- एडीजी दलजीत चौधरी यांनी सांगितले की, कानपूर आणि लखनऊमध्ये संशयित दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. कानपूर एटीएसने एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. दुसरा ठाकूरगंजमधील  एका घरात लपून बसला आहे. कंमाडोंनी संबंधित घर घेरले आहे. त्याच्याकडे शस्त्र आहे. तो कमांडोच्या दिशेने गोळीबारही करत आहे.
- त्याला जिवंत पकडण्यासाठी कमांडो प्रयत्न करत आहे. एटीएसचे आयजी स्वत: ऑपरेशनचे नेतृत्त्व करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका आयएसआय एजन्टच्या पोलिसांनी हरदोई रोडवर मुसक्या आवळल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...