आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मिस वर्ल्ड' संदर्भातील वक्तव्य थरूर यांना भोवणार, महिला आयोग दाखल करणार FIR

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस नेते शशी थरूर यांनी रविवारी मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनल्यानंतर केलेल्या ट्वीटने वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महिला आयोगावे (NCW) थरूर विरोधात FIR दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. NCW च्या अध्यक्ष रेखा शर्मा म्हणाल्या की, ज्या तरुणीने भारताचे नाव जगात उंचावले तिचा अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. थरूर यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते, 'हमारी तो 'चिल्लर' भी मिस वर्ल्ड बन गई'. थरूर यांच्या या ट्वीटवर अनुपम खेर आणि ट्विटर यूझर्सनेही आक्षेप घेतला होता. हरियाणामध्ये जन्मलेल्या 20 वर्षीय मानुषीने 17 वर्षांनंतर भारताला मिस वर्ल्डचा ताज मिळवून दिला. 


थरूर चुकीचे हे दाखवून द्यायचे आहे.. 
- रेखा शर्मा म्हणाल्या की, आम्ही आधी थरूर यांना समन्स पाठवण्याच्या विचारात होतो, पण त्यांनी माफी मागितली. पण फक्त माफी मागणे योग्य नाही. ते माफी मागून लोकांना शांत राहायला सांगत आहेत, असे वाटते. 
- ज्या तरुणीने भारताना सन्मान मिळवून दिला, तिचाच अपमान केला जात आहे. ते चुकीचे आहेत, हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे. 
- थरूर यांनी या ट्वीटद्वारे मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर हल्ला चढवला होता. त्यांनी ट्वीट केले की, नोटबंदी एक चूक होते. भाजपला हे समजायला हवे की, आपली कॅश जगावर राज्य करते. अगदी आमची 'चिल्लर'ही मिस वर्ल्ड बनली आहे. भारतात सुट्या पैशांना बोलीभाषेत चिल्लर म्हणतात. 


ट्वीटला जोरदार विरोध...
- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी या ट्वीटवर आक्षेप घेतला. तुमची पातळी एवढी कशी घसरली असे ते म्हणाले. 
- एक यूझर म्हणाला, छिल्लर हा एक शूर समाज आहे, त्याची खिल्ली उडवू नका. तुम्ही थरूर आहात, थोर नाही. 
- सोशल मीडियावर होत असलेल्या विरोधानंतर थरूर यांनी आणखी एक ट्वीट करून या प्रकरणी माफी मागितली. 

 

बातम्या आणखी आहेत...