आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • That Person Give Up Lack Package And Starts Tea Centre, Food Mall

त्‍यांनी लाखोंचे पॅकेज सोडून चहाची टपरी, फूड मॉल सुरू केले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - काहीच करता आले नाही तर कमीत कमी चहाची टपरी तरी चालवू, असे नेहमीच म्हटले जाते. परंतु अगदी चांगला जॉब, लाखोंचे पॅकेज, गाडी, बंगला कंपनी देत असेल तर, ते सोडून कोणी चहाची टपरी सुरू करत असेल तर विचित्र वाटते. मात्र हे खरे आहे. रायपूरमध्ये एमटेक, बी.टेक, एमबीएसारखे व्यावसायिक पदवीधर युवकांनी मोठय़ा वेतनाचे पॅकेज सोडून टी-स्टॉल व फूड जंक्शन सुरू केले आहेत. ते या भागात चांगले लोकप्रिय होऊ लागले आहे. ते केवळ यासाठी की, त्यांना आपल्या मनासारखे काहीतरी करण्याची इच्छा होती.


फूड जंक्शनवर लोक थांबतात
दिव्य पृथवानी (25) याने आयएमटी गाझियाबादमधून एमबीए केले.परंतु चांगली नोकरी सोडली. शहरातील न्यू राजेंद्र नगरमध्ये तफरीह फूड जंक्शन सुरू केले. ते खवय्यांना फ्यूजन फूडची नवीन व्हराईटी देऊ लागले आहे. येथे प्रयोग करून कप, केक, इडलीसारखे अनेक नवीन पदार्थ लाँच करू लागले आहेत. कॉर्पोरेट विश्वातील समारंभात त्याचे लाइव्ह डेमो करतात आणि पुरवठा करतात. दरवेळी नवीन प्रयोग किंवा संशोधन केले जाते.


मित्रांसोबत टू अँड बड खोली
स्नेहा अग्रवालने नागपूरमधून एमबीए केले. चेन्नईच्या कंपनीत आठ लाखांचे पॅकेज सोडले. नोकरीत मन रमत नव्हते. पाच मित्रांच्या मदतीने योजना तयार केली. चहाचे दुकान टू अँड अबड खोली. दोन पाने व एक काळा चहा कडक बनवला जातो म्हणून हे नाव.


मार्ग
नागपूर, रायपूर, गाझियाबादमधील तरुण-तरुणींच्या कामांची वेगळी पद्धत, फ्रँचायझीदेखील देऊ लागले
कोपर्‍यावरील टी कॅफे, देशाचा कानाकोपरा शोधला


ऑर्डर लिहून घेतो
बोलणे-श्रवणात अपंग असलेल्या लोकांना रोजगार देण्याची प्रियंकची इच्छा आहे. त्यामुळे चहा सर्व करण्याचे काम स्वत: करतो. त्यासाठी लवकरच नुक्कडची चेन बनवली जाणार आहे.


काय विशेष : ग्रंथालय
समात कॉलनीमध्ये हे दुकान आहे. गावातील वातावरण. 20 प्रकारच्या चहा. छोटेखानी ग्रंथालय, जेथे मासिके व पुस्तके वाचायला मिळू शकतात.


प्रियंक पटेलने बीटेक नंतर पुण्यातील कंपनी जॉइन केली. सात लाखांचे पॅकेज होते. पण समाधान नव्हते. फेलोशिप घेतली, ओडिशा, महाराष्ट्रातील अनेक गावांत समाजसेवा केली. कमवण्यासाठी जबलपूरहून रायपूरला आला. चहाची दुकान वेगळ्या पद्धतीने सुरू करण्याचा विचार केला. नेटवर देशाची सफर केली. सर्वेक्षण केले. अखेर नुक्कड टी कॅफेचा जन्म झाला.