आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांची मुलगी होणार आई; गर्भपाताची याचिका फेटाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- ती स्वत: एक मुलगीच आहे,  फक्त १० वर्षे ६ महिन्यांची. तिला गर्भात वाढत असलेल्या मुलाला जन्म द्यावा लागेल. गर्भपात केल्याने मुलीच्या जिवाला धोका आहे, असा निकाल जिल्हा न्यायालयाने मंगळवारी दिला. मुलीचा मामाच तिचे लैंगिक शोषण करत होता. मुलगी अल्पवयीन आहे, त्यामुळे गर्भपात करावा, अशी मागणी करणारी याचिका तिच्या आई-वडिलांनी दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका खारीज केली.   

न्यायमूर्ती पूनम आर. जोशी यांच्या न्यायालयाने डॉक्टरांच्या अहवालावर हा निकाल दिला. जीएसीएच-३२ च्या स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी अहवालात म्हटले होते की, मुलीचे शरीर सध्या विकसित नाही, त्यामुळे मुलीचा गर्भपात केल्यास तिच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्याचबरोबर प्रसूती शस्त्रक्रियेद्वारेच होईल. त्यामुळेही तिच्या जिवाला धोका आहे. त्यानंतर मुलीचा गर्भपात केला जाऊ केला जाऊ शकत नाही, असा निकाल न्यायालयाने दिला. गर्भावस्थेदरम्यान मुलगी रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकाच्या निगराणीखाली राहील. तत्पूर्वी, आई-वडिलांच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने जीएमसीएच-३२ ला मुलीच्या प्रकृतीबाबत अहवाल देण्यास सांगितले होते.  वरिष्ठ डॉक्टरांच्या चमूने मुलीची तपासणी करावी आणि प्रसूती करणे योग्य राहील की गर्भपात हे सांगावे, असे न्यायालयाने म्हटले होते. डॉक्टरांच्या चमूने अहवाल तयार करून सादर केला. त्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला आणि मुलीला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यास सांगितले.  

काय झाले होते?...  
गेल्या शुक्रवारी मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले होते. आईने चाचणी केली तेव्हा मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना माहिती देण्यात आली. समुपदेशनादरम्यान मुलीने पोलिसांना सांगितले की, मामा काही दिवसांपासून घरी येत होता आणि माझ्याशी चुकीचे वर्तन करत होता. तसेच कोणाला सांगितले तर तुझ्या बहिणीशीही असेच करेन, अशी धमकी देत होता. पोलिसांनी आरोपी मामा कुलबहादूरला अटक केली.  

मामाने केला होता अत्याचार, देखभालीसाठी चमू गठित  
महिला आणि बालक हेल्पलाइनचा एक चमू मुलीच्या देखरेखीसाठी तैनात राहील आणि आई-वडिलांच्या संपर्कात राहील. मुलीला कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागला तर तिला मदत व्हावी हा हेतू.  

दररोज झाली प्रकरणाची सुनावणी  
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयात रोज सुनावणी झाली. ही घटना गेल्या शुक्रवारी उघड झाली होती. पोलिसांनीही तत्परता दाखवली.  

पालक मुलाला करू शकतात सरेंडर  
या प्रकरणात मुलीचे आई-वडील जन्म झालेल्या मुलाला सरेंडर करू शकतात. त्यासाठी त्यांच्याकडे दोन महिन्यांचा वेळ असेल.
बातम्या आणखी आहेत...