आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी तुकडीवर हल्ला, 3 जवानांसह महिलेचा मृत्यू, शोध मोहिमेवरून परत होती तुकडी, दोन अधिकारी जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात शोध मोहिमेनंतर परतणाऱ्या लष्करी तुकडीवर अतिरेक्यांनी दबा धरून हल्ला केला. हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आणि एका महिलेचा मृत्यू झाला. दोन अधिकाऱ्यांसह ५ जवान जखमी झाले. हल्ल्याची जबाबदारी हिज्बुल मुजाहिदीनने घेतली आहे.
 
बुधवारी रात्री उशीरा कुगनू भागात अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने शोध मोहीम हाती घेतली. अनेक तासांच्या मोहिमेनंतर अतिरेक्यांचा ठावठिकाणा न लागल्यामुळे तुकडी परतली. मुल्लू चिट्टरगाम भागात अतिरेक्यांनी दबा धरून जवानांवर हल्ला चढवला. गोळीबारात अनंतनागचा रहिवासी गुलाम मोहिद्दीन राथर, केरळचा रहिवासी श्रीजिथ एम.जे. व राजस्थानचा विकाससिंह गुर्जर हे तीन जवान शहीद झाले. लेफ्टनंट कर्नल मुकेश झा, मेजर अमरदीप, नायक सुरेंद्र कुमार, शिपाई सुमेर सिंह व अजय पाल जखमी झाले.
 
 
हल्ल्यादरम्यान नजिकच्या एका घरातील महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला. जान बेगम,असे महिलेचे नाव आहे. हिज्बुल मुजाहिदी या अतिरेकी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यापुढेही असेच हल्लेे केले जातील,अशी धमकी एका फोन कॉलच्या माध्यमातून देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...