आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्‍टमॉर्टम रुममध्‍ये ठेवली मृत गाय; अन् भर मैदानात केले मुलीचे शवविच्छेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुटुंबिंयासमोरच पोस्‍टमार्टम करताना गाडरवारा सरकारी हॉस्प्टिचे डॉक्‍टर. - Divya Marathi
कुटुंबिंयासमोरच पोस्‍टमार्टम करताना गाडरवारा सरकारी हॉस्प्टिचे डॉक्‍टर.
जबलपूर- मध्‍यप्रदेशमधील नरसिंहपूरमध्‍ये खुल्‍या मैदानात 14 वर्षांच्‍या मुलीचे पोस्‍टमॉर्टम केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार घडला आहे. पोस्‍टमॉर्टम हाऊसमध्‍ये गायीचे शव असल्‍यामुळे मैदानात पोस्‍टमॉर्टम केले, असे स्‍पष्‍टीकरण डॉक्‍टरांनी दिले आहे.
 
नरसिंहपूरमधील गाडरवारामध्‍ये सरकारी हॉस्पिटलच्‍या मैदानात मुलीच्‍या कुटुंबियांसमोरच हा प्रकार घडला. यावर संतप्त कुटुंबियांनी हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारल्‍यानंतर एसडीएम यांची परवानगी घेतल्‍यानंतरच पोस्‍टमॉर्टम केले, असे डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र, एसडीएम यांनी आपण अशी कोणतीही परवानगी दिली नाही, असे म्हणत प्रकरणातून हात झटकले.
 
वीजेच्‍या धक्‍क्‍याने मुलीचा मृत्‍यू
- गाडरवारामधील महंगवा गाव येथे आरती दुबे (14) या मुलीचा रविवारी संध्‍याकाळी वीजेच्‍या धक्‍क्‍याने मृत्‍यू झाला होता.
 
पोस्‍टमॉर्टम हाऊसमध्‍ये गायीचे शव
- पोस्‍टमॉर्टम हाऊसमध्‍ये गायीचे शव असल्‍यामुळे सोमवारी सकाळी 11 वाजेच्‍या सुमारास डॉ. पंथी कोरी यांनी खुल्‍या मैदानात कोणताही पर्दा न टाकता मुलीचे पोस्‍टमार्टम केले.
 
मुख्‍यमंत्र्यांना निवेदन, कारवाईची मागणी
- या प्रकाराविरोधत ब्राम्‍हण महासभेने तीव्र आक्षेप घेत मुख्‍यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना एसडीएमविरोधात कारवाई करण्‍याची मागणी केली आहे.
- शिवराज सिंह चौहान यांना निवेदन देत डॉक्‍टरांच्‍या या अमानवीय कृत्‍याविरोधात त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महासभेने केली आहे.   
 
बातम्या आणखी आहेत...