आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस लाफिंग क्लब; 9 नोव्हेंबरला 5 राक्षस मारायचे आहेत- मोदी; भाजपची प्रचाराला सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांगडा - काँग्रेस पक्ष हा सडलेल्या विचारधारेचा नमुना असून आम्ही या विचारधारेपासून मुक्त भारत इच्छितो. भ्रष्टाचाराला अजिबात थारा देणार नाही, असे आश्वासन काँग्रेस देत आहे. मात्र, त्यांचेच मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेले आहेत. हिमाचल प्रदेशातील सत्ताधारी काँग्रेस पक्ष ‘लॉफिंग क्लब’ बनला आहे, अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आगामी ९ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांगरामधून भाजपच्या प्रचाराला गुरुवारी सुरुवात केली.   या वेळी त्यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली.  डोकलाम वादाच्या प्रकरणात चिनी नेत्यांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावर मोदींनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना धारेवर धरले. मोदी म्हणाले, ज्यांचे वडील, आजी आणि आजोबा भारताचे पंतप्रधान राहिले आणि जे जन्मापासून सत्ताधारी पक्षात वाढले आहेत, ते अशा प्रकारे अपमानास्पद वागतात. डोकलाम मुद्द्यावर चिनी नेत्यांची भेट घेण्यापूर्वी केंद्रात सत्तेत बसलेल्या सरकारला का विचारले नाही? असा सवालही त्यांनी केला.   
 
महात्मा गांधी, क्रांतिकारकांची काँग्रेस राहिली नाही  
मोदी पुढे म्हणाले, महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांची काँग्रेस आता राहिली नाही तर आताची काँग्रेस भ्रष्टाचाराने बरबटली आहे. आताचा काँग्रेस पक्ष सडलेल्या विचारधारेचा नमुना आहे. आम्ही काँग्रेसमुक्त भारत म्हणतो. तेव्हा या सडलेल्या विचारधारेपासून मुक्ती इच्छितो. देशभरातील जनता स्वच्छता अभियानात व्यग्र आहे. निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या जुनाट पक्षाचाही सफाया करून टाकतील.
 
काँग्रेसने देवभूमीत राक्षस पैदा केले  
हिमाचल प्रदेश स्थितीबाबत मोदी म्हणाले, काँग्रेसने या देवभूमीचे हाल करून ठेवले आहेत. देवांच्या भूमीत राक्षस पैदा केल्याचे कधी ऐकिवात नव्हते. पण, काँग्रेस सरकारच्या काळात या भूमीत राक्षस पैदा झाले. खाण माफिया, वन माफिया, मादक द्रव्य तस्कर, बदली करणारे माफिया आणि निविदा माफिया हेच ते पाच राक्षस आहेत. आम्ही या राक्षसांपासून हिमाचल प्रदेशला मुक्त करू इच्छित आहोत. मी येथील जनतेच्या नाड्या ओळखतो. त्यामुळे आम्ही या ठिकाणी निश्चित विजय मिळवू, असा आशावादही त्यांनी या सभेत व्यक्त केला.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, आणखी काय म्‍हणाले मोदी... 
बातम्या आणखी आहेत...