आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेराची सदस्य विपश्यना पोलिस स्टेशनला हजर, पोलिसांनी विचारले - हनीप्रीत कुठे आहे?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनीप्रीत कुठे आहे हे विपश्यना इन्साला माहित असेल असा पोलिसांचा कयास आहे. - Divya Marathi
हनीप्रीत कुठे आहे हे विपश्यना इन्साला माहित असेल असा पोलिसांचा कयास आहे.
सिरसा - डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापनाची सदस्य विपश्यना इन्सा सोमवारी पोलिसांसमोर हजर झाली. रविवारी पोलिसांनी तिला नोटीस बजावली होती, मात्र ती हजर झाला नव्हती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विपश्यनाला हनीप्रीत आणि पंचकुलामध्ये दंगल भडकवण्यात कोणाकोणाचा हात होता, याची विचारणा करण्यात आली. हनीप्रीतबद्दल विपश्यनाला अनेक प्रश्न विचारले गेले, मात्र तिचे एकच उत्तर होते, की तिच्यासोबत शेवटचे बोलणे 25 ऑगस्टला झाले होते. त्यानंतर हनीप्रीत कुठे गेली हे माहित नाही. 
 
म्हणाली तब्यत ठिक नव्हती...
- विपश्यनाला पोलिसांनी रविवारीच चौकशीसाठी बोलावले होते, मात्र तिने तब्यत बरी नसल्याचे कारण देत वेळ मारुन नेली. सोमवारी दुपारी 3.30 वाजता विपश्यना सिरसा येथील सेक्टर-20 येथील हुड्डा पोलिस चौकीत हजर झाली. येथे डीसीपी कुलदीपसिंह बेनीवाल यांनी तिची चौकशी केली. 
 
हनीप्रीतसोबत 25 ऑगस्टला शेवटचे बोलणे 
 
प्रश्न - हनीप्रीतसोबत शेवटचे बोलणे केव्हा झाले?
उत्तर - 25 ऑगस्टला बोलणे झाले होते. त्यानंतर हनीप्रीत कुठे गेली माहित नाही. 
प्रश्न - पंचकुला येथे झालेल्या हिंसाचारात तुझी भूमिका काय होती?
उत्तर - माझी त्यात काहीही भूमिका नव्हती. मी शांततेचे आवाहन केले होते, त्याचे मीडियामध्ये पुरावे आहेत. हिंसेचे काम काही असमाजिक तत्वांकडून झाले, त्याच्याशी आमचे काहीही देणेघेणे नाही. 
प्रश्न - 23 सप्टेंबरला बाबाच्या पदग्रहणानिमित्त कोणते कार्यक्रम होणार आहे? 
उत्तर - या प्रश्नावर विपश्यना एवढेच म्हणाली की आम्ही सांगितले आहे - आपापाल्या घरातच हा कार्यक्रम साजरा करा. 
 
विपश्यना बाबाच्या थिंक टँकमध्ये 
- डेरामध्ये पाच व्यक्तींचा एक समिती होती. त्याला डेराचा थिंक टँक म्हटले जात होते. या थिंक टँकची विपश्यना महत्त्वाची सदस्य होती. तिच्याशिवाय यामध्ये डॉ. पी.आर.नैन, डॉ. आदित्य इन्सा, दिलावर इन्सा आणि हनीप्रीत यांचा समावेश होता. आदित्य आणि दिलावर दोघे फरार आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही डेराचे प्रवक्ते होते. हनीप्रीत नेपाळला पळून गेल्याची सध्या चर्चा आहे.
- विपश्यना आणि डॉ. नैन यांच्यावर अजून कोणताही गुन्हा दाखल नाही. सध्या डेराचे संपूर्ण व्यवस्थापन विपश्यना पाहात आहे. 
- पोलिस अजूनही विपश्यनाकडे चौकशी करु शकते. पोलिसांना डेराच्या चौकशीत एक हार्डडिस्क सापडली होती. त्यामुळे डेराच्या आयटी हेडला अटक होऊ शकते. 
 
हनीप्रीत आधी विपश्यना होती बाबाची 'राजदार' 
- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिमची कथित मानस कन्या हनीप्रीत 2011 मध्ये डेरामध्ये आली. तिच्या आधी विपश्यना तिच्या भूमिकेत होती, म्हणजे डेराच्या ऐपिसोडचे प्रमुख पात्र विपश्यना होती. तिचे शिक्षण डेराच्या संस्थेतच झाले होते. 
- विपश्यनाने एमबीए केल्यानंतर डेराच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये अध्यक्षपद सांभाळले आणि ती डेराचे संपूर्ण प्रशासन पाहू लागली. 
- 2011 मध्ये हनीप्रीतची एन्ट्री झाल्यानंतर बाबा राम रहिमचे सर्व 'राजदार' मागे पडले मग त्यात विपश्यनाही होती. हनीप्रीत सर्वांना मागे टाकत बाबाची सर्वात विश्वासू बनली आणि बाबा जेलमध्ये बंद झाल्यानंतर स्वतः उडन छू झाली. 
- आता हरियाणा पोलिस, रॉ, गुप्तचर संस्था हनीप्रीतचा शोध घेत आहे मात्र अद्याप तिचा थांगपत्ता लागलेला नाही. 
 
बातम्या आणखी आहेत...